मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि विदर्भावर सक्रीय असून, त्यामुळे अनेक ठिकाणी भरपूर पाउस होत आहे. गेल्या २४ तासात हर्णे मध्ये २०० मिमी., वेंगुर्ला येथे ११८ मिमी., अलिबाग १०६ मिमी, रत्नागिरी येथे १०६ मिमी., चंद्रपूर मध्ये ९६ मिमी. आणि डहाणू येथे ५० मिमी. पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मुंबईत सुद्धा ६० मिमी. पाउस नोंदवण्यात आलेला आहे.
पुढील २४ तासांत कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, मुंबई, ठाणे, डहाणू, हर्णे, वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथे जोरदार पाउस अपेक्षित आहे.
[yuzo_related]
पावसाची तीव्रता उत्तर महाराष्ट्रातही वाढण्याची शक्यता असून आणि मालेगाव, नाशिक, अहमदनगर आणि जळगावसारख्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाउस होवू शकतो. पुण्यात देखील हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
विदर्भात चांगला पाउस होत असून त्याची तीव्रता येत्या काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे, प्रामुख्याने गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती याठिकाणी एक-दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाउस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यासह लगतच्या भागात तसेच दक्षिण मध्य-महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील
Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com