[Marathi] 19 जुलै - महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई, डहाणू, नागपूर, अकोला येथे मुसळधार पाउस; पुणे, नाशिकमध्ये चांगला पाऊस

July 18, 2017 5:00 PM|

 

नैऋत्य मौसमी पावसाने कोंकण किनारपट्टीवर आणि विदर्भावर जोरदार पुनरागमन केलेले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झालेला आहे। गेल्या २४ तासात अलिबागमध्ये १७३ मिमी. पावसाची नोंद झालेली असून, हर्णे येथे १५० मिमी., डहाणू मध्ये १२७ मिमी. आणि नागपूर येथे १३५ मिमी. पावसाची नोंद केली गेली आहे।

मुंबईमध्ये देखील या मोसमात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला असून १६३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे। पुढील २४ तास महाराष्ट्रात अशाच प्रकारचे हवामान राहण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या उत्तर भागातील किनारपट्टीवर मुसळधार पाउस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे, तसेच मुंबईसह, ठाणे, डहाणू आणि रत्नागिरीमध्ये आणखी एकदा मुसळधार पावसाच्या काही सरी होण्याचा अंदाज आहे।

[yuzo_related]

ओडिशाहून विदर्भाकडे जाणा-या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (depression) विदर्भासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाउस होण्याची शक्यता आहे। मुख्यत्वे गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती येथे मध्यम ते जोरदार, तर जालना, नांदेड आणि हिंगोली येथे चांगला पाउस अपेक्षित आहे।

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकताRain In Mumbai

दरम्यान पुणे, अहमदनगर, नाशिक, मालेगांव आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रातील उर्वरित भागांत हलका पाउस अपेक्षित आहे।

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 

Similar Articles