Skymet weather

[Marathi] 17 ऑगस्ट- महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मुंबई-पुणेसह नागपूर येथे हलका पाऊस; औरंगाबाद, जळगाव येथे कोरडे हवामान

August 16, 2017 6:03 PM |


 

महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये ऑगस्ट महिन्याची सुरुवात तुरळक पावसाने झाली आहे. तथापि, गेल्या 2 दिवसापासून कोकण-गोवा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. गेल्या २४ तासांत प्रामुख्याने हर्णे, भिरा, महाबळेश्वर, अलिबाग, रत्नागिरी आणि मुंबई या शहरात हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाने दडी मारलेली असून, सांगली, सातारा, औरंगाबाद, कोल्हापूर आणि जळगावसह मध्य-महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये देखील हवामान कोरडेच आहे.

[yuzo_related]

पुढील २४ तासांत विदर्भासह, कोकण आणि गोवा येथे तुरळक सरींची अपेक्षा आहे व २४ ते ४८ तासांनंतर, मराठवाड्यासह विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, एक-दोन जोरदार सरींची शक्यता देखील नाकारता येत नाही.

महाराष्ट्रावरील सद्य वीजेची आणि गडगडाटी परिस्थितीची माहिती पण मिळवू शकता
Rain In Mumbai

Please Note: Any information picked from here should be attributed to skymetweather.com

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try