[MARATHI] नव्याने उद्भवलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे दिल्लीसह उत्तर भारतात वादळी पावसाची शक्यता

April 30, 2015 2:16 PM | Skymet Weather Team

नव्याने उद्भवलेल्या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम जम्मूकाश्मीरला होण्यास सुरुवात देखील झालेली असून हळूहळू हिमाचल प्रदेश व उत्तराखंड पर्यंत याचा तडाखा आज रात्रीपर्यंत पोहचेल. स्कायमेट ने वर्तविल्यानुसार गडगडाटी वादळी पावसाची हि प्रणाली डोंगरी भागाच्या पायथ्याशी तसेच उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे.

जम्मूकाश्मीर मधील पाऊस

बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासातील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- बनिहाल   येथे ८.५ मिमी, गुलमर्ग येथे ४.२ मिमी, काजीगंद येथे ७ मिमी आणि कोकेरनाग येथे ६ मिमी पावसाची नोंद केली गेली. तसेच पहलगाम आणि श्रीनगरला पावसाच्या हलक्या सरी झाल्याची नोंद केली गेली.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या गडगडाटी वादळी पाऊस होऊन त्यामुळे  तापमानातही घट झालेली दिसून आली. जम्मूकाश्मीर मध्ये कमाल तापमानाची नोंद २०० से. केली गेली असली तरी त्यात ६ ते ७० से. ने घट होण्याची शक्यता आहे.

उत्तरेतील पठारी भागातील पाऊस

पंजाब आणि हरयाणाच्या उत्तर भागांवर घनदाट ढग दाटून आलेले आढळले आहे. दिवसाच्या उर्वरित भागात दिल्ली एनसीआर ला वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

हा वातावरणातील बदल साधारणतः दोन दिवस तरी तापमानात फारशी वाढ होऊ देणार नाही. किमान तापमानही सरासरीपेक्षा कमीच असेल. दिल्लीतील सफदरजंग  या वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार बुधवारी दिल्लीचे कमाल तापमान ३७.२० से. आणि चंडीगड येथे दिल्लीपेक्षा कमी ३५.४० से. होते. तसेच पुढील चार दिवसात बऱ्याच ठिकाणी तापमानात फारसा बदल होणार नाही.

 Image Credit: hillpost.in

OTHER LATEST STORIES