Skymet weather

[Marathi] नाशिक, पुणे येथे दिवस आणि रात्रीच्या तापमानात अंतर, उन्हाळी पिकास सिंचित करावे

February 19, 2018 5:42 PM |

pune post

संपुर्ण फेब्रुवारी महिन्यात मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहिले आहे. जेंव्हा १०-१३ फेब्रुवारी दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस आणि गारपीट झाली होती त्यावेळेस मात्र मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ होते. ज्यामुळे दिवसाच्या तापमानात घट झाली होती.

[yuzo_related]

मागील काही दिवसात मध्य महाराष्ट्रातील, किमान आणि कमाल तापमानात वाढ होत आहे. रात्रींचे तापमान सुद्धा आता सरासरीच्या तुलनेत किंचित जास्त नोंदले गेले. येत्या २-३ दिवसांत मध्य महाराष्ट्रातील तापमानात कोणताही बदल संभवत नाही. येत्या काही दिवसात वातावरणाची स्थिती स्थिर आहे ज्यामुळे,   हवामान साधारणतः कोरडे आणि निरभ्र राहील.

संपूर्ण महाराष्ट्रातच हवामान कोरडे, शुष्क आणि निरभ्र राहील, ज्यामुळे दिवस गरम आणि रात्री थंड राहतील.

शेतीची करावयाची कामे

निरभ्र आकाश आणि वाढलेले तापमानामुळे,   शेतकरी बांधवानी रब्बी हंगामातील पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण करावी. तसेच पाऊस आणि गारपीटग्रस्त पिकांना उन्हात वाळण्यास ठेवावे.

शेतकरी बांधवानी उन्हाळी भुईमुगास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. सोबतच फळबाग आणि भाजीपाला पिकाचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करावे. गरजेनुसार औषधी फवारावी.

Image Credit: Instagram

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try