[Marathi] पुण्यात पुढील दोन दिवस पाऊस त्यानंतर हवामान कोरडे राहणार

August 24, 2019 4:13 PM | Skymet Weather Team

पुण्यात जुलैअखेरपासून साधारण ६ ऑगस्टपर्यंत मध्यम सरींच्या रूपात चांगला पाऊस पडला. तेव्हापासून हवामान पूर्णपणे कोरडे झाले नसून शहरात काही ठिकाणी हलका पाऊस नोंदला गेला आहे. पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी ऑगस्टमध्ये असा पाऊस सुरूच आहे.

आता मात्र पुण्यात जास्त पावसाळी गतिविधींची अपेक्षा नाही. तथापि आणखी दोन दिवस एक-दोन ठिकाणी हलका पाऊस  होण्याची शक्यता आहे.

दरम्यान २५ ऑगस्टनंतर संपूर्ण मध्य-महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाळी गतिविधी कमी होणार असल्याने हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. पावसाळी गतिविधींच्या अभावामुळे पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागांत २८ ते २९ ऑगस्टपर्यंत कोरडे हवामान राहील.

त्यानंतर पुन्हा पावसाळी गतिविधींमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते, परंतु शहरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नाही.

आपण असे म्हणू शकतो की हवामान सुखद आणि आरामदायक राहील, परंतु पुढील काही दिवस शहरात पावसाळी गतिविधी कमी राहतील. तथापि, स्थानिक हवामान विषयक गतिविधींची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शहरात पुरसदृश्य परिस्थिती उद्भवण्याचा धोका नाही हे ऐकून रहिवाश्यांना नक्कीच दिलासा मिळेल.

Image Credits – Pinterest

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES