नागपूर, अकोला, लातूर येथे कोरडे हवामान, गहू व इतर रब्बी पिकांची कापणी पूर्ण करावी

February 26, 2018 6:38 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात मागील बऱ्याच दिवसांपासून हवामान पूर्णतः कोरडे राहिले आहे. जर विभागवार हवामानाची स्थिती बघितल्यास,विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअस ने जास्त आहे. अकोला येथे आजचे दिवसाचे कमाल तापमान ३७. ५°C नोंदले गेले, तर गोंदिया येथे ३५°C, नागपूर ३६.२°C आणि वर्धा येथे ३६.५ °C नोंदले गेले.

[yuzo_related]

स्काय मेट च्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भात अजून काही दिवस हवामान कोरडे आणि शुष्क राहील; ज्यामुळे दिवसाच्या तापमानात घट होण्याची शक्यता नाही.

पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता वाढून तापमान ३०°C   च्या वर नोंदले जाईल. किमान तापमान सुद्धा सरासरीपेक्षा २-३°C ने जास्त राहील. सोबतच, रात्री सुद्धा गर्मी मध्ये वाढ होईल. बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, आग्नेय दिशेकडून वाहणाऱ्या गरम वारे मराठवाड्यावर परिमाण करत आहेत. ज्यामुळे ह्याभागातील किमान तापमान वाढेल.

वातावरणाचा शेतीवर होणारा परिणाम

मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी बांधवानी कोरड्या आणि उष्ण हवामानाचा फायदा घेऊन गहू आणि इतर रब्बी पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण करावी. त्यासोबतच पक्व झालेल्या संत्रा, डाळिंब आणि द्राक्ष फळांची काढणी पूर्ण करावी. तसेच उन्हाळी पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

Image Credit: toi

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES