Skymet weather

[Marathi] नागपूर, बुलढाणा येथे निरभ्र आणि कोरडे हवामान, रब्बी पिकाची कापणी करावी

February 14, 2018 6:04 PM |

Maharashtra 1

विदर्भातील बऱ्याच भागात जसे कि  बुलढाणा, नागपूर  वाशीम, अकोला  भागात मागील २-३ दिवसात पाऊस  आणि गारपीट झाली.  मागील २४ तासांत गारपीटीच्या घटना घडल्या  असल्या  तरी, गारपिटीची तीव्रता  कमी झाली आहे.

अकोला  येथे मंगळवारी सकाळ ८.३० पासून च्या २४ तासात ४ मिमी  पावसाची नोंद झाली. काल  सुद्धा    बुलढाणा, वाशीम परभणी आणि उस्मानाबाद  येथे गारपीट झाल्याची माहिती मिळते आहे. विदर्भापेक्षा  मराठवाड्यात गारपिटीची तीव्रता कमी होती.

[yuzo_related]

सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील किमान तापमानात घट झाली. सद्यस्थितीत  उत्तर आणि ईशान्य  दिशेवरून वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडून वाहणारे थन्ड वारे असल्यामुळे किमान तापमानात घट होईल, तर कमाल तापमान निरभ्र आकाश आणि सूर्यप्रकाशामुळे वाढेल.

Maharashtra

Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

स्काय मेट  वेदर च्या अंदाजानुसार, दिवस उबदार आणि निरभ्र  राहतील, तर रात्री  थंड आणि प्रसन्न हवामान राहील.  मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमान  परत ३३- ३५ अंश सेल्सिअस  पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील ८-१० दिवसात वातारणामध्ये  कोणतेही मोठे बदल संभवत नाहीत. वातावरण पूर्णतः कोरडे राहील.

शेतीची करावयाची कामे आणि शिफारस

गारपिटीमुळे ग्रस्त झालेली शेती आणि फळबागा मधे स्वच्छता करावी. ग्रस्त  झालेल्या  फळबागांची काळजी घ्यावी, तसेच रोग पसरणार नाही ह्याची काळजी  घ्यावी.  शेतकरी बांधवानी  रब्बी पिकाची  कापणीस  १५ फेब्रुवारीनंतर पुनः  सुरुवात करावी आणि शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

Image Credit: wikipedia.org

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try