बऱ्याच दिवसानंतर विदर्भातील तापमान, विशेषत, कमाल तापमान आता सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले आहे. कोरड्या, शुष्क आणि निरभ्र हवामानामुळे तापमानचा पारा वाढला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी होते. सध्या ह्या भागातील दिवसाचे तापमान ३०-३५ अंश सेल्सिअस च्या दरम्यान आहे, अकोला येथे कमाल तापमान ३५.५ अंश तर वर्धा येथे ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.
[yuzo_related]
स्काय मेट वेदर च्या पूर्वअंदाजानुसार येत्या काही दिवसात वातावरणाची स्थिती स्थिर राहील ज्यामुळे, साधारणतः कोरडे आणि निरभ्र राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातच हवामान कोरडे, शुष्क आणि निरभ्र राहील, ज्यामुळे दिवस गरम आणि रात्री थंड राहतील. येत्या काही दिवसात विदर्भातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल. महाराष्ट्रातील सर्व विभागात, हवामान कोरडे राहील.
शेतीची करावयाची कामे
निरभ्र आकाश आणि वाढलेल्या तापमानामुळे, विदर्भातील शेतकरी बांधवानी रब्बी हंगामातील पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण करावी. तसेच पाऊस आणि गारपीटग्रस्त पिकांना उन्हात वाळण्यास ठेवावे.
शेतकरी बांधवानी उन्हाळी भुईमुगास गरजेप्रमाणे पाणी द्यावे. सोबतच फळबाग आणि भाजीपाला पिकाचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करावे. गरजेनुसार औषधी फवारावी.
Image Credit: tripadvisor.in
Any information taken from here should be credited to skymetweather.com