Skymet weather

विदर्भ हवामान : मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे वाशिम, अकोला, नागपूर आणि बुलढाणा येथे पिकांचे अतोनात नुकसान

February 12, 2018 4:44 PM |

Maharashtra Weather 1

स्काय मेट च्या पूर्व अंदाजानुसार, विदर्भातील सर्वच  जिल्यामध्ये जसे कि, बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ आणि नागपूर  येथे मागील २४ तासांत विजेच्या गडगडाटासह  मोठ्या पावसाची नोंद झाली. काही  ठिकाणी प्रचंड प्रमाणात  वादळी वाऱ्यासह  गारपीट झाली असून,तुरळक ठिकाणी अर्ध्या  तासापर्यंत गारपीट चालू होती.

[yuzo_related]

काल  झालेलया अवकाळी पावसामुळे, विशेषतः  गारपिटीच्या  तडाख्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाल्याची माहिती  मिळते आहे.  प्राथमिक  माहिती  नुसार, गहू, हरभरा, ज्वारी, संत्रा, डाळिंब, पपई, कांदा  आणि भाजीपाला  पिकांचे  प्रचंड नुकसान  झाले आहे.

येत्या  २४ तासांत अजून पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज  असून, पिकांना  होणारा  धोका टळलेला  नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी  त्यांच्या  पिकांची शक्य असेल तेवढी  काळजी घेण्याचा  प्रयत्न  करावा.

सध्याची  वातावरणाची स्थिती  निवळून, कोरडे आणि थंड  वारे उत्तर  आणि  दक्षिण  दिशेकडून वाहतील.

Maharashtra

Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

बंगालचा  उपसागर आणि  अरबी समुद्रावरून येणारे  दमट वारे मराठवाडा आणि विदर्भातील भागांवर येऊन मिसळल्यामुळे  गारपीट झाल्याचे  हवामान तज्ञाचे मत आहे.

फक्त पावसामुळे एवढे नुकसान ह्योण्याची शक्यता नसून,वादळी वारे आणि प्रचंड प्रमाणात झालेली  गारपीट ह्यास कारणीभूत आहेत. एक- दोन ठिकाणी  जीवितहानी झाल्याची  माहिती मिळते आहे.

पावसापूर्वी मात्र, विदर्भात हवामान कोरडे होते, तसेच कमाल तापमानाचा  पारा  सरासरीच्या  वर होता.   सध्याच्या  स्थितीत कमाल आणि किमान तापमानात  लक्षणीय  घट झाली आहे. दिवस आणि रात्रीचे तापमान सुद्धा  थंड आणि आल्हाददायक  राहील.

Image Credit: tripadvisor

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try