महाराष्ट्र शासनाने या पूर्वी जाहीर केलेल्या “महावेध” या उपक्रमांतर्गत नागपूर येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवंद्र फडणवीस आणि स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने पहिले स्वयंचलित हवामान केंद्राचे(AWS) उद्घाटन केले.
महावेध उपक्रमांतर्गत नागपूर येथे महाराष्ट्रातील पहिलेच स्वयंचलित हवामान केंद्र (AWS) सुरु झाल्यावर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले कि त्यांनी जे आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला दिले होते त्यातलाच हा एक भाग आहे.
नागपूर येथील डोंगरगावात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेले हे स्वयंचलित हवामान केंद्र हे पहिलेच केन्द्र असून अजून असे २०६५ केंद्र संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेबरोबर महाराष्ट्र शासनाने “महावेध” या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात या स्वयंचलित हवामान संस्था सुरु करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या यंत्रणेमार्फत होणाऱ्या पावसाची तीव्रता, आर्द्रता तसेच किती प्रमाणत पाऊस होईल आणि शेतकऱ्यांना कुठले पिक घ्यावे याचीही माहिती या अचूकपणे मिळू शकते.
स्कायमेट हि भारतातील खाजगी हवामान संस्थांपैकी एक अग्रणी हवामान संस्था असून त्यांनी दिलेल्या अचूक आणि तंतोतंत देण्यात येणाऱ्या हवामांच्या अंदाजासाठी गणली जाते. स्कायमेट सोबत असलेल्या निष्णात आणि पारंगत हवामान तज्ञांच्या सहाय्याने हि हवामान संस्था नेहमीच अचूक हवामानाचा अंदाज देऊ शकते.
स्कायमेट या संस्थेने गेल्या दशकात हवामान शास्त्रातील विविध शाखांचा सखोल आढावाही घेतला आहे उदाहरणादाखल हवामानाचा अंदाज आणि अचूक वेध, कृषी हवामान शास्त्र, हायड्रोमेटेरोलोजी (जल हवामान शास्त्र ) तसेच हवामानाच्या अचूक नोंदी आणि मोजमाप. या उपक्रमासाठी स्कायमेट या संस्थेने सर्व केंद्रांची माहिती हि एकत्रितपणे आणि केंद्रानुसार मिळावी या साठी एक पोर्टल तयार केले आहे. या मुळे सरकारी यंत्रणेलाही माहिती घेणे निश्चितच सोपे होईल.
भारतातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यां मागे प्रामुख्याने चुकीचा हवामानाचा अंदाज कारणीभूत आहे असे दिसून येत असल्याने हे प्रमाण कमी व्हावे या साठी महाराष्ट्र सरकार आणि स्कायमेट हि खाजगी हवामान संस्था मिळून महाराष्ट्रात एकूण २०६५ स्वयंचलित हवामान संस्था बसवण्याचे योजना राबवण्यास सज्ज आहे. तसेच १००० केंद्र येत्या महिन्याभरात सक्रीय होतील अशी अपेक्षा आहे.
Any information taken from here should be credited to skymetweather.com