संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या वातावरण कोरडे असून, कमाल तापमान चांगलेच वाढले असून, सरासरीच्यावर काही अंश स्थिरावले आहे. मराठवाडा, कोंकण आणि गोवा येथे सुद्धा तसेच वातावरण आहे.
कोंकण आणि गोव्यात वातावरण काही अंशी ढगाळ आहे पण येथे पावसाची शक्यता नाही. येथे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान सरासरीच्या २ ते ३ अंश जास्त असून, किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले.
मुंबईत दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअस जास्त आहे. स्काय मेट च्या अंदाजानुसार मुंबईत ९ फेब्रुवारीच्या नंतर किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस ने घट होण्याची शक्यता आहे.
[yuzo_related]
जर मराठवाड्यातील हवामानाची स्थिती बघितली गेल्यास, येथे दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त असून, रात्रीचे तापमान मात्र सरासरीच्या वर २ ते ३ अंश सेल्सिअस ने जास्त आहे. जसे कि औरंगाबाद मध्ये किमान तापमान सरासरी पेक्षा ४ अंश सेल्सिअस ने जास्त आहे आणि नांदेडमध्ये रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले.
Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra
मध्यम ते दाट ढग सध्या मराठवाड्यवर दाटले असून ११ फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे व त्यानंतर तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पावसांच्या सरीनंतर तापमान २- ३ अंश सेल्सिअस ने कमी होण्याची शक्यता आहे.
वातावरण बदलामुळे शेतीची करावयाची कामे
ढगाळ वातावरणामुळे कोंकण आणि गोव्यातील शेतकऱ्यांनी आंबा आणि काजू फळबागांची काळजी घ्यावी. फळबागांमध्ये कीड पडण्याची शक्यता असून , शेतकऱ्यांनी फुल/ बहार गळती होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची सद्यःस्थितीत काळजी घ्यावी.
तसेच शेतकरी बांधवानी उन्हाळी भुईमूग आणि भात पिकाची पेरणी पूर्ण करावी व त्याबरोबच लवकर पेरणी केलेल्या भुईमूग आणि भात पिकास गरजेनुसार पाणी द्यावे.
Image Credit: dnaindia.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com