[Marathi] पश्चिम बंगाल सह पूर्व भारतात जोरदार गडगडाटा सह वादळी पावसाचा तडाखा सुरूच

April 24, 2015 7:02 PM | Skymet Weather Team

गुरुवारी पश्चिम बंगाल येथे जोरदार वादळी पावसासह वावटळाचाही तडाखा बसला आहे. उप हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथेही गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस झालेला आहे. सिक्कीम मधील गंगटोक आणि तडोंग येथे अनुक्रमे ७३.५ मिमी आणि ७२ मिमी पावसाची नोंद झालेली दिसून आली. येत्या ७२ तासात अशीच पर्जन्य वृष्टी सुरूच राहील असा अंदाज आहे. छत्तीसगड मधेही काही ठिकाणी पावसाची हजेरी लागलेली दिसून आली.

पश्चिम बंगाल येथील वादळाने बिहार मध्ये २१ एप्रिल रोजी झालेल्या वादळाची तीव्रतेने आठवण करून दिली, बिहार मधील वादळाने खूप नुकसान तर झालेच पण त्याबरोबरच ६५ जणांचा बळीही गेला होता.

पश्चिम बंगाल मध्ये गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे

या प्रकारचा अवकाळी पाऊस आणि वादळ हे पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळच्या अभिसरणामुळे निर्माण झालेले आहे. याचा तडाखा लांबवर म्हणजेच कर्नाटक तसेच झारखंड, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशाला तुरळक पावसाच्या स्वरुपात बसणार आहे. तसेच उत्तर ओडिशा आणि विदर्भातहि पावसाची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, झारखंड आणि उत्तर ओडिशा येथे जोरदार वावटळ उठण्याची तसेच तशी १०० किमी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेशातील काही भाग, विदर्भ आणि तेलंगाना येथे धुळीचे वादळ आणि पावसाची शक्यता आहे.​

 

 

OTHER LATEST STORIES