[Marathi] नाशिक,जळगाव येथे विजेच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता, पक्व पिकाची कापणी करावी

February 21, 2018 4:23 PM | Skymet Weather Team

सततच्या गरम आणि  शुष्क  हवामानापासून महाराष्ट्राची सुटका नाही असे दिसते. म्हणूनच संपूर्ण राज्यात उष्ण  आणि शुष्क हवामान आहे. मध्य महाराष्ट्रात  कोरड्या  हवामानामुळे तापमानात  वाढ  होत आहे, काही ठिकणी तर तापमान  सरासरीच्या वर गेले आहे.  पावसाच्या अभावामुळे  मध्य महाराष्ट्रात तापमान  सरासरीच्या  तुलनेत  ४ अंश सेल्सिअस ने जास्त आहे.

मध्य महाराष्टातील अहमदनगर शहरात  कमाल तापमान  ३७.७°C  इतके नोंदले गेले जे सरासरीपेक्षा  ४°C ने जास्त होते.  जळगाव आणि   सोलापूर इथे  दिवसाचे कमाल तापमान  सरासरीच्या वर नोंदले  गेले ; जे ३५ °C च्या  वर  होते.

स्काय मेट वेदर च्या अंदाजा नुसार, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे  राहील. तापमान  सुद्धा  सरासरीच्या वर राहील.  पण असे असले  तरी,  स्काय मेट  वेदर च्या पूर्वअंदाजा नुसार, दक्षिण मध्य  अरबी समुद्रापासून मध्य  महाराष्ट्रावर  कमी दाबाचा पट्टा  तयार होत आहे. हा पट्टा  पुढील ४८ तासांत अजून मजबूत  होईल.

[yuzo_related]

बंगालच्या  उपसागावरून येणारे गरम वारे आणि अरबी समुद्रावरून  येणारे थंड वारे  मध्य महाराष्ट्रात  एकत्र  येऊन  २३ आणि २४ फेब्रुवारी दरम्यान विजेच्या  गडगडासह  पाऊस  पडेल.  औरंगाबाद, अहमदनगर,जळगाव  आणि  नाशिक  ह्या जिल्ह्यात  मुख्यत्वे  पाऊस  पडेल.

शेतीची करावयाची  कामे

येत्या  आठवड्यात  होणाऱ्या  पावसाच्या  अंदाजामुळे, शेतकरी बांधवानी रब्बी  पिकांची पेरणी पूर्ण करावी. तसेच  पक्व  झालेल्या संत्रा, मोसंबी, डाळिंब, आणि द्राक्ष  फळांची काढणी करावी, जेणेकरून  कमी नुकसान होईल. कापलेली  पिके  सुरक्षित  ठिकाणी ठेवावीत.

Image Credit: Instagram (travelmasti9064)             

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES