[MARATHI] दक्षिण आणि मध्य भारतात हलक्या पावसाची शक्यता

May 4, 2015 10:08 AM | Skymet Weather Team

 

दक्षिण आणि मध्य भारतातील काही ठिकाणी येत्या चोवीस तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे गेले काही दिवस वाढलेल्या उष्म्या पासून थोडा आराम मिळेल.

भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार छत्तिसगढ आणि आसपासच्या भागावर तयार झालेला कमी दाबामुळे तेथे चक्रवाती हवेचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाचा हा पट्टा छत्तिसगढ पासून विदर्भ, कर्नाटकातील काही भाग ते तामिळनाडू पर्यंत पसरला आहे.

या प्रणाली चा एकत्रित परीणाम म्हणजे छत्तिसगढ विदर्भातील काही भाग, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भाग तसेच तामिळनाडू आणि केरळ येथे पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतात काही ठिकाणी या आधीच हवामानातील बदला मुळे पावसाची हजेरी लागलेली आहे.

रविवारी सकाळी ८ वाजे पर्यंत घेतलेल्या नोंदीनुसार गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे.

स्कायमेट ने नुकत्याच वर्तविलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर येत्या चोवीस तासात कमी होईल. त्यामुळे मुळे दक्षिण भारतातील पावसाची तीव्रता कमी होईल. पण छत्तिसगढ द्क्षिणेकडिल भाग आणि तेलंगणा येथील काही ठिकाणी येत्या ४८ तासात अधूनमधून पावसाच्या सरी होत राहण्याची शक्यता आहे.

OTHER LATEST STORIES