महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मंगळवारी पावसाने अचानक हजेरी लावलेली दिसून आली, तसेच मध्य महाराष्ट्रात मात्र जोरदार पावसाची नोंद करण्यात आली.
बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे, सोलापूर येथे ५४.३ मिमी, कोल्हापूर येथे ४२.४ मिमी, सांगली येथे १३.८ मिमी आणि पुणे व सातारा येथे अनुक्रमे ४.४, १.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रापर्यंत होत असल्याने मंगळवारी महाराष्ट्रात अचानक पाऊस झाला.
हवामानाच्या अंदाजानुसार बुधवारी सुद्धा महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून नंतर मात्र हा पाऊस थांबेल.
या अचानक झालेल्या पावसामुळे या भागातील तापमानात लाक्षणिक बदल झालेला असून तापमान चक्क २० अंश से. पेक्षा कमी होऊन स्थिरावले आहे. बुधवारी सकाळी सोलापूर येथे किमान तापमानाची नोंद सरासरीच्या ७ अंश से. ने कमी म्हणजेच १८.५ अंश से. करण्यात आली. तसेच कोल्हापूर येथेही किमान तापमानाची नोंद सरासरीच्या ३ अंश से. ने कमी म्हणजेच १९.२ अंश से. करण्यात आली.
सध्या भारतात सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र हि त्याला अपवाद नसून दरवर्षी येथेही कडक उन्हाळा असतो आणि त्याच बरोबर दिवस रात्र तापमानाचा पारा खूप वर असतो. पण अचानक उद्भवलेल्या हवेच्या चक्रवती व कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाल्याचे दिसून आले. गेले काही दिवस महाराष्ट्रात तापमानाचा पारा रोज ४० अंश से. पेक्षा जास्त असल्याने तेथील नागरीक उकाड्याने त्रस्त झाले होते त्यांना या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे. तापमानात झालेला हा बदल पुढचे दोन दिवस तरी राहील व त्यामुळे हैराण करणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
Image Credit: eprahaar.com