महाराष्ट्राचे हवामान बराच काळ कोरडी झाले आहे.कोरडे हवामान खरे तर मार्च च्या शेवटच्या आठववड्यापासून आहे. सतत कोरड्या हवामानामुळे कमाल तापमान वाढले असुन ते ४०अंशापर्यंत नोंदविले गेले आहे.
तथापि, गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रमध्ये कोल्हापूर व सोलापूर येथे काही प्रमाणात पाऊस पडला आहे. हा पाऊस कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाला आहे या पट्ट्यातील वारे पूर्वोत्तर राजस्थान व कर्नाटक ओलांडून विदर्भ आणि मराठवाड्याकडे वाहत आहेत. स्काय मेटच्या हवामान नुसार, या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज विदर्भ आणि मराठवाडा भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस झाला आहे तथापि, कोकण विभागाची पावसाची तीव्रता मध्य महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. या मान्सून पूर्व पाऊसाने नागपूर, अकोला, चंद्रपूर, नांदेड, परभणी, लातूर, जालना, हिंगोली, नाशिक, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली आहे.
[yuzo_related]
हा पाऊस १० एप्रिल पर्यंत राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर ह्या मान्सून पूर्व पाउसाबरोबर पुढील २४ तासात ढगांच्या गडगडाटीसह गारपीट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कमाल तापमान २ ते ४ अंशांनी कमी नोंदविले जाऊ शकते व कमाल तापमान ४० अंशावरून कमी होऊन ३०अंशापर्यंत येउन स्थिर होऊ शकते.
११ एप्रिल नंतर हवामान सामान्य होऊन ढगाळ वातावरण दुर होऊन किमान तापमान वाढु शकते.
आपण आता कोकण आणि मध्य महाराष्ट्च्या शेतीवर उष्ण हवामानाचे होणारे परिणाम पाहू:
शेतकरी मित्रांना सल्ला देण्यात येत आहे कि काढणीला आलेली सर्वे पिके काढुन सुरक्षित ठिकाणी साठवावी .गारपिटीपासून फळबागा व पिकांचे पिकांचे संरक्षण करण्यासाठीं योग्य ती उपपाययोजना करावी . फळबागा आणि भाज्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी, शेतकरी बांधवानी गवत किंवा पॉलीथीन कागदाचे आच्छादन(मल्चिंग )घालावे.
तापमानमधे देखील घट होण्याची शक्यता आहे,त्यामुळे पिकांवर कीड वाढली जाऊ शकते, त्यासाठी शेतकरी मित्रांनि कीटक आणि रोग प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.
Image Credit: Tripadvisor
Any information taken from here should be credited to skymetweather.com