[Marathi] यंदाचा मान्सून समाधानकारक - स्कायमेटचा अंदाज

April 22, 2015 7:29 PM | Skymet Weather Team

नवी दिल्ली १६ एप्रिल २०१५: भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने २०१५ या वर्षाचा मान्सून अहवाल जाहीर केला आहे. स्कायमेटने वर्तविल्यानुसार यंदाचा मान्सून हा समाधानकारक म्हणजेच साधारणतः दीर्घकालीन सरासरीच्या १०२% (±४%) असणार आहे. पावसाळ्याचे पूर्ण चार महिने जुन ते सेप्टेंबर या वेळेत दीर्घकालीन सरासरी ८८७ मिमि आहे.

स्कायमेट ने वर्तविल्यानुसार भारतातील द्वीपकल्पाच्या भागात जून, जुलै, ऑगस्ट, सेप्टेंबर मध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच तामिळनाडू, रायलसीमा, दक्षिणी कर्नाटक, पूर्व मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या सर्व ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल. पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिमी किनारपट्टी येथे चांगल्या पावसाची शक्यता आहे.

स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जतीन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार “एल निनो उन्हाळ्यातही सुरूच राहील पण त्याचा प्रतिकूल परिणाम हा मान्सूनवरही होणार नाही.” यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असून साधारणपणे दिनांक २७ मे रोजी ते अपेक्षित आहे. संपूर्ण देशात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी लागणार असून अवकाळी पाऊसही मे महिन्यात अधून मधून येतच राहणार आहे.

तसेच हिंदी महासागरात द्विध्रुवीकरणाच्या उदयाचे कोणतेही चिन्ह अद्यापपर्यंत दिसलेले नाही.

स्कायमेट नुसार मान्सून चे चार महिने (जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर) मध्ये होणाऱ्या पावसाचा सरारी अंदाज पुढीलप्रमाणे

८% जास्त पावसाची शक्यता (दीर्घकालीन सरासरीच्या ११०% जास्त)
२५% सामान्य पातळीपेक्षा थोडा जास्त (दीर्घकालीन सरासरीच्या १०५% ते ११०% च्या मध्ये)
४९% सामान्य (दीर्घकालीन सरासरीच्या ९६% ते १०४% च्या मध्ये)
१६% सामान्य पातळीपेक्षा कमी (दीर्घकालीन सरासरीच्या ९०% ते ९५% च्या मध्ये)
२% दुष्काळ सदृश्य परिस्थिती (दीर्घकालीन सरासरीच्या ९०% पेक्षा कमी )

महिन्यानुसार मान्सूनचे अंदाजपत्रक पुढीलप्रमाणे

जून : दीर्घकालीन सरासरीच्या १०७% (दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमि)
६४% सामान्य पावसाची शक्यता
२९% सामान्य पातळीपेक्षा जास्त
७% सामान्य पातळीपेक्षा कमी

जुलै : दीर्घकालीन सरासरीच्या १०४% (दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमि)
७४% सामान्य पावसाची शक्यता
१७% सामान्य पातळीपेक्षा जास्त
९% सामान्य पातळीपेक्षा कमी

ऑगस्ट : दीर्घकालीन सरासरीच्या ९९% (दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमि)
७२% सामान्य पावसाची शक्यता
१०% सामान्य पातळीपेक्षा जास्त
१८% सामान्य पातळीपेक्षा कमी

सप्टेबर : दीर्घकालीन सरासरीच्या ९६% (दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमि)
५९% सामान्य पावसाची शक्यता
१६% सामान्य पातळीपेक्षा जास्त
२५% सामान्य पातळीपेक्षा कमी

स्कायमेट हि भारतातील सर्वात मोठी हवामान तसेच कृषी क्षेत्रातील जोखीम यावरील उपाययोजना सांगणारी संस्था आहे.या संस्थेत हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतीसाठी उत्पन्न होणारे धोके हवामानाचा अभ्यास करून वर्तविले जातात.

गेले ११ वर्षे स्कायमेट हि संस्था कार्यरत असून प्रसार माध्यमे,कृषिक्षेत्र तसेच विमा संस्था यांना लागणारी उपयुक्त माहिती या संस्थेचे वातावरण विश्लेषक पुरवितात. तसेच देशातील टाटा पावर, रिलायन्स इन्फ्रा ,वर्ल्ड बँक, एचडीएफसी एर्गो, भारतीय कृषी विमा कम्पनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोम्बार्ड, हिंदुस्तान टाईम्स, द हिंदू एन्द टेलेग्राफ हे काही या संस्थेचे ग्राहक आहेत. तसेच स्कायमेट या संस्थेमध्ये एज टेक वेंचर कॅपिटालीस्ट ओम्निवेयर आणि डीएमजी::इन्फोर्मेशन यांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे.

 

 

OTHER LATEST STORIES