Skymet weather

[Marathi] तापमानाच्या चढत्या पाऱ्यामुळे नागपुरात प्रचंड उन्हाळा

May 1, 2015 5:51 PM |

Nagpur heatनागपूर शहर हे पर्यटकांसाठी एक ‘हॉट स्पॉट’ आहे असे म्हणण्यास जरी हरकत नसली तरी आता मात्र शब्दशः अर्थ घेण्याची वेळ आलेली दिसते आहे. २०१५ चा हा उन्हाळा आणि उष्ण लहर या शहराला हैराण करणाऱ्या दिवसांची सुरुवात करणारा आहे.

महाराष्ट्रातील नागपूर हे शहर फक्त संत्र्यांसाठीच प्रसिद्ध नसून तेथील प्रचंड गरमी आणि चढत्या तापमानासाठीही प्रसिद्ध आहे. साधारणतः नागपूरला दर उन्हाळ्यात ४० से. पेक्षा जास्त तापमान असते. स्कायमेट या हवामान संस्थेनुसार नागपूर येथे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा ४५ से. गाठण्याची शक्यता आहे.

स्कायमेट या हवामानसंस्थेतील प्रमुख हवामानशास्त्रज्ञ श्री. जी. पी. शर्मा यांनी सांगितल्या नुसार एप्रिल महिना हा जरी सुखकारक असला तरी नागपूर साठी मात्र मे महिना गरमीचाच असेल कारण वातावरणात अशी एकही प्रणाली दिसत नसून महाराष्ट्रात इतर ठिकाणीही कमाल तापमान जास्त असेल.

या शहराकडे कुठल्याही प्रकारचे वारे वाहत नसल्याने उन्हाळ्याची तीव्रता कितीतरी पटींनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच पुढील काही दिवस नागपूरचे वातावरण अतिशय उष्ण, कोरडे व रुक्ष असेल.

एप्रिल महिन्यातील टोकाचे वातावरण

या वर्षी एप्रिल महिन्यात मात्र नागपूरकरांना एक वेगळाच अनुभव आला आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात सरासरी पावसापेक्षा पाचपट जास्त पाऊस झालेला आढळून आला. गेल्या वर्षीही जोरदार पावसामुळे ३८.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. हि नोंद गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक नोंद आहे. तसेच नागपूर शहरात २८ एप्रिल २००९ साली सर्वाधिक ४४.५ से. या कमाल तापमानाची नोंद झाली होती.

Image Credit: IndiaTVnews

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try