काही दिवसांपूर्वी कोकण आणि मध्य-महाराष्ट्र विभागात तापमान सामान्य पातळीच्या जवळआले आहे, म्हणजेच कमी झाले आहे. उत्तरेकडील आणि उत्तर-पश्चिम वाराचा प्रवाह यामुळे तापमानात कमी होत आहें आणि आणखी दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे.
सध्यादेखील, कोकणातील बहुतेक भागांचे तापमान ३० अंशापर्यंत नोंदविले गेले आहे, बहुतेक ठिकाणी ३५ अंशापेक्षा कमी तापमान दिसुन आले.
सोमवारी, अलिबागमध्ये ३०.५ अंश कमाल तापमानाची नोंद झाली असुन, डहाणू ३१.६ अंश, रत्नागिरी ३२.५ अंश, महाबळेश्वर ३२.६ अंश, मुंबई ३३.४ अंश, आणि वेंगुर्ला ३५.१ अंश असे नोंदविले गेले. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र, विशेषतः, उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा २ ते ३ अंशाने वाढले आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र भागात कमाल तापमान सामान्य तापमानाजवळ नोंदविले गेले.
त्याचवेळी कमाल तापमान कोल्हापूर येथे ३७ अंश, सातारा ३७.७ अंश, सांगली ३८.२ अंश, पुणे ३८. ६ अंश, नाशिक ३९.२ अंश, अहमदनगर ४०.५० अंश, सोलापूर ४०.६ अंश व जळगाव येथे कमाल तापमान ४१.८ अंश एवढे नोंदविले गेले.
[yuzo_related]
स्काय मेटच्या हवामान अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन्हीविभागाचे हवामान कोरडे राहील. या काळानंतर, विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रामधे कमी दाबाचे क्षेञ निर्माण होण्याची शक्यता आहे.या हवामान प्रणालीमुळे 6 एप्रिल किंवा 7 ला कोकण विभागात सुमारे काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस होणे अपेक्षित आहे, समान परिस्थिती मध्य महाराष्ट्रामधे ७ किंवा ८ एप्रिल ला येऊ शकते.
पाऊसाची हि परिस्थिती किमान दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. तथापि, या सरींची तीव्रता कोकणच्या काही पट्ट्यामध्ये अतिशय कमी राहील.दरम्यान दक्षिण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ह्या पावसामुळे गारपीट होण्याची शक्यता 6 एप्रिल ते 9 एप्रिल ला नाकारता येत नाही. परभणी, लातूर, उस्मानाबाद, जालना सारखे क्षेत्रांमध्ये गारपीट होणे अपेक्षित आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या शेतीवर उष्ण हवामानाचा होणारा परिणाम पाहू:
पुढील 2-3 दिवस कोरडे हवामान राहणार अशी शक्यता असल्यामुळे पिकांचे जास्ती बाष्पीभवन होऊ शकते म्हणुन शेतकरी बांधवानी पिंकाना पानी द्यावे.
कोकण विभागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो म्हणून, शेतकरी बांधवाना किमान 6-7 दिवस पीक काढणीच्या आधी भाताच्या शेतामधील पानी काढून घ्यावे हा सल्ला देण्यात येत आहे. तसेच शेतकरी मित्रांनी सकाळी आणि संध्याकाळी आंबा पीक काढणी सुरू ठेवावी आणि फळे सावलीत साठवावी. मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे,त्यामुळे शेतकरी वर्गानी सर्व फळबागा व पिकांचे संरक्षण करावे ,पिक काढणी लवकर करून एका सुरक्षित ठिकाणी सर्व उत्पादने साठवावी.
Image Credit: IndiaTVNews.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com