[Marathi] पुणे, नाशिक, महाबळेश्वर, रत्नागिरीमध्ये पाऊस पडला.पिकांना सिंचन आणि खते देणे टाळा

April 17, 2018 3:07 PM | Skymet Weather Team

स्काय मेट ने दिलेल्या हवामान अंदाजनुसार विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाची नोंद झाली. तथापि, कोकणातील हवामान कोरडे राहिले. सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत २४ तासांच्या आत, गोंदियामध्ये 14.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, औरंगाबादमध्ये 3 मिमी आणि सोलापूरमध्ये 1 मीमी एवढया पाऊसाची नोंद झाली.

दरम्यान, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि नागपूर या शहरातील काही भागात पाऊस पडला.स्काय मेट हवामान नुसार,येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हा पूर्व मान्सूनचा पाऊस अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, आणि उदगीर या शहरात पण होण्याची शक्यता आहे.तथापि, हा पाऊस अल्प कालावधीसाठी असेल आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी पारा पातळीमध्ये कोणत्याही बदलाची अपेक्षा नाही.

[yuzo_related]

तथापि कोकणामध्ये पहिल्यांदा पाऊस आगमन होऊ शकते. हा येणारा पाऊस कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे होणार आहे ,यामुळे वारे मध्य महाराष्ट्रयच्या उत्तरेकडून तामिळनाडूकडे वाहत आहेत . दुसरीकडे विदर्भातील हवामान कोरडे होईल आणि सध्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानमधे वाढ होईल. या प्रदेशाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० अंश तापमान किंवा त्यापेक्षा जास्ती तापमानाची नोंदणी होऊ शकते.

हवामानाचा महाराष्ट्र कृषी पट्टावर होणारा प्रभाव पाहू:

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस होऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनी केळी, पपई, फळ झाडे आणि भाज्या यांचे संरक्षण करून योग्य ती उपाययोजना करावी. तसेच उसामध्ये प्रॉपिंग करावे . फळ व पीक काढणी सुरु ठेवावी .तसेच शेतकरण्यासाठी सल्ला आहे कि पिकांना सिंचन आणि खते देणे टाळा . विदर्भातील, प्रचलित हवामान पाहता शेतकरी बांधवाना सल्ला देण्यात येत आहे की, उन्हाळी पिके (भुईमूग, तीळ, मूग) यांना पानी दयावे. मराठवाड्यात कोरडे हवामान राहु शकते त्यामुळे तिथल्याही फळ व पिकांना पानी दयावे.

Image Credit:  en-climate.data

Any information taken from here should be credited to skymetweather.com  

 

OTHER LATEST STORIES