[Marathi] नागपूर, वाशीम, अकोला, येथे ९ मार्च ला पावसाची शक्यता, मराठवाड्यात कोरडे हवामान

March 5, 2018 3:36 PM | Skymet Weather Team

सद्यस्थितीत, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान उष्ण आहे. तापमान इतके वाढले आहे कि, कमाल तापमान ३७ ते ३८°C च्या दरम्यान नोंदले जात आहे. उदाहरणार्थ, परभणी चे दिवसाचे तापमान ३८.४°C,अकोला ३८°C, गोंदिया ३७.५°C आणि वर्धा येथे ३७°C नोंदले गेले.

[yuzo_related]

स्काय मेट हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भावर अंशतः ढगाळ वातावरण आहे.तर मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडेच राहील,पण अधून मधून हवामान ढगाळ हवामान राहील. त्यापुढे, ९ आणि १० मार्च ला विदर्भात हलका पाऊस पडेल आणि काही ठिकाणी वाऱ्यांसह पाऊस पडेल.

येत्या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या पावसामुळे, तापणाऱ्या उन्हापासून आणि उष्णतेपासून अंशतः सुटकारा मिळेल. पावसाच्या शिडकाव्यानंतर मात्र, तापमानाचा पारा वाढेल. या कालावधीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, हिंगोली आणि लातूर येथे हवामान अंशतः ढगाळ किंवा पूर्णतः ढगाळ राहील.

शेतकरी बांधवासाठी सूचना

शेतकरी बांधवानी वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळी भुईमूग आणि भाजीपाला पिकास नियमित पाणी द्यावे. तसेच वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या ( ६-९ महिने) संत्रा, डाळिंब, पेरू, आंबा आणि मोसंबी फळबागेस सुद्धा पाणी द्यावे. शेतकरी बांधवानी फळबागेतील झाडांना आच्छादन करावे जेणेकरून, पाण्याचे बाष्पीभवन कमी होईल. शेतकरी बांधवानी रब्बी पिके तसेच पक्व फळपिकांची काढणी करावी.

Image Credit: gajananmaharaj.org

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES