[Marathi] रत्नागिरी, सांगली, सातारा आणि कोल्हापूर मधे पावसाची शक्यता, गहू आणि रब्बी ज्वारीची कापणी करावी

March 12, 2018 6:57 PM | Skymet Weather Team

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आता पर्यंत कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. पण मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसाचा लपंडाव मात्र चालूच होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोंकण प्रदेश पूर्णतः कोरडा राहतो. त्याप्रमाणेच मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता कमीच असते.

जेव्हा अरबी समुद्रात एखादी प्रणाली तयार होते त्यावेळेस कोंकण आणि गोव्यात पाऊस पडतो. वर्षांच्या ह्या कालावधीत, स्पष्ट आणि तीव्र असा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता कमीच असते. पण ह्या वर्षी मात्र सुस्पष्ट कमी दाबाचे केंद्र कोमोरीन भागात तयार झाले आहे. जे पुढे वायव्य भागात मार्गक्रमण करून त्यानंतर अरबी समुद्रात उत्तरेकडे जाईल.

[yuzo_related]

कमी दाबाच्या केंद्रामुळे कोंकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात १४ मार्च पासून पावसाची सुरुवात होईल. दि. १६ मार्च पर्यंत कोंकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव चालूच राहील. पावसाची तीव्रता दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोंकणच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात जास्त राहील.

दि. १५ , १६ मार्च च्या दरम्यान बऱ्याच जिल्यामध्ये पावसाची हजेरी लागेल, रायगड आणि अहमदनगर मध्ये सुद्धा हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई मध्ये सुद्धा दि. १५ , १६ मार्च पावसाची हजेरी ची शक्यता आहे. १७ मार्च नंतर पावसाची तीव्रता कमी होईल,पण, तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील.
शेतीसाठी शिफारस

शेतकरी बांधवानी पावसाची शक्यता लक्षात घेऊन गहू, रब्बी ज्वारी, आणि करडई पिकाची कापणी करावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
त्यासोबतच काढणीस तयार असलेली द्राक्ष, डाळिंब,चिकू फळाची काढणी करावी. पावसामुळे आंब्याचा बहराचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकरी बांधवानी दक्ष राहावे. पुढील ३-४ दिवस उन्हाळी पिकास सिंचन टाळावे. काढलेली फळे आणि पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावेत

Image Credit: tripadvisor

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES