मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात वातावरण पूर्णतः कोरडे आहे . कोरड्या हवामानामुळे वातावरणात गरमी वाढली असून, वाढलेल्या गरमीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील २४ तासांत नोंद झालेल्या तापमानावरून याचा प्रत्यय येतो.रत्नागिरी मध्ये दिवसाचे तापमान तब्बल ३५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले असून, ते सरासरीच्या ५ अंश जास्त आहे. त्या प्रमाणेच जळगाव येथे सुद्धा दिवसाचे तापमान ३४. ६ अंश सेल्सिअस नोंदले गेले जे सरासरीच्या वर ३ अंश इतके होते.
[yuzo_related]
स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात वातावरण अंशतः ढगाळ राहील.आमच्या अंदाजानुसार ६ आणि ७ फेब्रुवारीला कमाल तापमानात कोणतीही घट होण्याची शक्यता नसून , कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार, १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. ह्यादरम्यान मध्य महाराष्ट्रात दिवस आणि रात्रीच्या तापमानात २-३ अंश घट होईल.
Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra
कोंकणात मात्र पावसाची कोणतीही शक्यता नसून, हवामान साधारणतः ढगाळ राहील. ज्यामुळे दिवसाचे तापमान २-३ अंश कमी होईल आणि वाढणाऱ्या गरमी पासून मुक्तता मिळेल.
बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणार परिणाम
मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अशी शिफारस करण्यात येते कि त्यांनी ज्वारीच्या पिकांची कापणी पूर्ण करून ज्वारीचे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. त्यासोबतच तयार असलेल्या हरभऱ्याची सुद्धा कापणी आणि मळणी करून योग्य ठिकाणी साठवणूक करावी.
शेतकरी बांधवानी गव्हाच्या पिकाची काळजी घ्यावी आणि १२ फेब्रुवारी नंतर गरजेनुसार पिकास पाणी दयावे. उन्हाळी भुईमूगाची पेरणी करण्यास प्रारंभ करावा आणि पेरणी पूर्ण करावी. वर वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात पावसाची शकयता आहे, त्यामुळे शेतकरी बांधवानी इतर पक्व पिकांची कापणी आणि मळणी पूर्ण करून पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
Image Credit: travelwithsmile.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com