[Marathi] नांदेड, नागपूर मध्ये पावसाची स्थिती, शेतीमालाची काळजी घ्यावी

February 8, 2018 6:56 PM | Skymet Weather Team

संपूर्ण  राज्यात कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली होती. पण बदललेल्या वातावरणामुळे मागील २४ तासांत दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले. तुरळक  ठिकणी पावसाचा शिडकावा  झाला.

राज्याच्या  विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल आणि किमान तापमान आता सरासरीच्या  जवळ असून काही ठिकाणी ते त्या खाली सुद्धा गेल्याचे आढळून आले. कमी तापमानामुळे वातावरण काहीसे आल्हादायक झाले आहे.

स्काय मेट च्या  हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, संपूर्ण राज्यावर असलेल्या ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली असून, उत्तर आणि  ईशान्य  दिशेकडून येणाऱ्या  वाऱ्यांमुळे किमान  तापमानात  सुद्धा  घट झाल्याचे आढळून आले.

कमाल तापमान जे ३० अंश सेल्सिअसच्यावर  नोंदले जात होते ते आता ३० अंश सेल्सिअस  च्या खाली आणि २० च्या वर  नोंदले  गेले.

[yuzo_related]

मागील २४ तासात विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा अनुक्रमे ४ आणि २ अंश सेल्सिअस ची  घट झाल्याचे आढळून आले. त्याबरोबरच बुलढाणा, वर्धा आणि अकोला येथे तापमान सरासरीच्या जवळपास नोंदले गेले.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

जर मराठवाड्यातील वातावरणाची  स्थिती बघितली गेल्यास  परभणी चे कमाल तापमान सरासरीच्या  खाली ४ अंश सेल्सिअस  होते, तर  नांदेड आणि औरंगाबाद येथे दिवसाच्या तापमानात एक  अंश सेल्सिअस  ची घट झाली. काल परभणी  येथे हलक्या  पावसाची नोंद झाली.

शेतीची करावयाची कामे

शेतकरी बांधवानी कापणी झालेल्या  शेतीमालास सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा प्लास्टिक ने झाकावे. येत्या  २-३  दिवसात  पावसाची शक्यता असल्यामुळे  शेतकरी बांधवानी  शेतीमालाची  काळजी घ्यावी. पूर्व  विदर्भातील शेतकऱ्यांनी  उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारी पूर्वी  पूर्ण करावी. तसेच भाताची लावाणी  पूर्ण करावी. पश्चिम  विदर्भातील शेतकरी बांधवानी हरभरा, करडई आणि तुरीची कापणी  पूर्ण  करून, मालास  सुरक्षित ठिकाणी हलवावे किंवा  प्लास्टिक ने आच्छादन करावे.

Image Credit: pinsdaddy.com             

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES