अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरड्या आणि उष्ण हवामानाची परिस्थिती अनुभवण्यात येत आहे. खरेतर, तापमानात ४५ अंश व त्यापेक्षा जास्त वाढ झाल्यामुळे राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण झाली आहे .
[yuzo_related]
स्काय मेट वेदर हवामान अंदाजानुसार खूप दिवसानंतर विदर्भातील काही जिल्ह्यात गेल्या १ ते २ दिवसात पूर्व मान्सूनचा पाऊस पडला. दरम्यान,इतर ठिकाणी हवामान कोरडे होते . गेल्या २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात ८ मि.मी. आणि वर्धा २ मि.मी.एवढी बुधवारी पावसाची नोंद झाली आहे . त्याचवेळी नागपूरमधे सुध्दा पूर्व मान्सूनचा हलकासा पाऊस पडला .
हा पाऊस कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाला कि ज्यामुळे दक्षिण भारताकडे जाणारे वारे राजस्थान कडून येऊन ,मध्य महाराष्ट्र व विदर्भ पार करून जाणार आहेत . मान्सून चे आगमन जरी झाले असले तरी , राज्यातील तापमानावर कोणताही मोठा फरक पडत नाही ,कारण हा पाऊस संध्याकाळी आणि दुपारनंतर येतो. त्यामुळे अजुनही विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्यामध्ये उष्णेतेचा काहूर माजलेला आहे .
स्काय मेट वेदर हवामान अंदाजानुसार कमी दाबामुळे वाहणारे वारे अजुनही विदर्भाजवळ आहेत ,त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासात विदर्भातील काही भागांत गडगडाटी वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे . तथापि हा पाऊस अतिशय थोड्या कालावधीसाठी व कमी प्रमाणात पडतो व तो संद्याकाळी जास्तवेळा पडतो . दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील हवामान कोरडे राहील . तसेच दिवसाचे कमाल तापमान कमी होऊन सामान्य तापमाना एवढे होईल अशी अपेक्षा आहे.
IMAGE CREDIT: Youtube.com
Any information taken from here should be credited to skymetweather.com