मार्च महिन्यात कोंकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हवामान पूर्णतः कोरडे असते त्यामुळेच इथे पावसाची शक्यता कमी असते. पूर्णतः कोरड्या हवामानामुळे ह्या भागातील तापमानातं वाढ होत आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा ३-४ अंशाने जास्त आहे. तर किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त आहे.
अरबी समुद्रात एखादी हवामाची विशिष्ट प्रणाली कार्यरत असल्यास कोंकण आणि गोव्यात पाऊस पडतो. आता सुद्धा पाऊस पडण्याचे कारण हेच आहे. स्काय मेट च्या हवामान अंदाजानुसार, कमी दाबाचे केंद्र विषुवृत्ताजवळ भारतीय महासागरात श्रीलंकेच्या जवळ तयार आहे.
[yuzo_related]
कमी दाबाचे केंद्र पश्चिम -ईशान्य दिशे कडे सरकत आहे, पुढील २४ तासात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होईल. वातावरणाच्या ह्या स्थितीमुळे,ह्या दोनही भागात १५ आणि १६ मार्च ला पाऊस होण्याची शक्यता आहे. १७ मार्च ला सुद्धा पाऊस सुरूच राहील आणि १७ मार्च ला रात्रीनंतर पावसाचा जोर कमी होईल.
Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra
सततच्या ढगाळ हवामान आणि पावसामुळे, कोंकणात तापमान कमी होईल. मुंबई, रत्नागिरी,डहाणू, ठाणे, पुणे,सांगली आणि सातारा भागात पावसाची दाट शक्यता आहे.
बदलत्या हवामानात शेतीची करावयाची कामे
शेतकरी बांधवानी रब्बी हंगामातील तयार पिके काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. वाढलेल्या तापमानामुळे शेतकरी बांधवानी भुईमूग आणि मका पिकास गरजेनुसार पाणी दयावे. पाऊस आणि तापमानांतील बदलांमुळे आंब्याचा मोहोर/ बहरास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी दक्ष राहावे.
Image Credit: Thrillophelia
Any information taken from here should be credited to skymetweather.com