पश्चिमी विक्षोभामुळे जम्मूकाश्मीरला तर पाऊस झालाच पण त्याचा तडाखा नेपाळच्या पश्चिमी भागालाही बसला आहे. पश्चिम नेपाळमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली असून हि पश्चिमीविक्षोभ प्रणाली नेपाळच्या पूर्वेकडे सरकलेली आहे. हि प्रणाली नेपाळकडे सरकल्यामुळे याचा परिणाम काठमांडू व आजूबाजूच्या परिसरातही होईल.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविल्या नुसार काल दिवसभरात नेपाळवर या वादळी हवामानाचा परिणाम सुरूच होता पण तरीही तेथील बचाव कार्यात बाधा मात्र आलेली नव्हती. भारतीय मदत पथकांनी नेपाळच्या सैन्यदलाला मदत व बचाव कार्यात अविश्रांत मदत केली.
सध्यस्थितीत काठमांडू येथील हवामान चांगले असून बचाव कार्यात कुठलाही अडथळा येऊ नये अशी अपेक्षा आहे. पण तरीही हा फार छोटा काळ असेल कारण वातावरणात वेगाने घडत असलेल्या बदलामुळे दिवसाच्या उत्तरार्धात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होऊन बचाव कार्यात अडसर निर्माण होऊ शकतो. असेच हवामान पुढचे २ किवा अधिक दिवस असण्याची शक्यता आहे.
पुढचे काही दिवस या भागात अधून मधून पाऊस होत राहणार आहे आणि त्यामुळेच मदत व बचाव कार्य करणाऱ्या पथकांना तेथेच छावणी लाऊन कार्य सुरु ठेवावे लागेल. नेपाळमधील मृतांचा आकडा ४००० वर गेला असून शेकडो मृतदेह हे अजूनपर्यंत ढिगाऱ्याखाली अडकून आहेत. नेपाळला सावरण्यासाठीच्या मार्गावर या दुःखद स्थितीचे आणि विस्कळीत पाऊस यांचे खूप मोठे आव्हान उभे आहे.
Image Credit (nbcnews.com)