[Marathi] नागपूर, लातूर, अकोला, परभणी येथे पाऊस, रब्बी पिकांची कापणी करावी

February 9, 2018 4:43 PM | Skymet Weather Team

कोरड्या आणि निरभ्र वातावरणामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भ भागातील कमाल तापमान वाढून सरासरीच्या वर नोंदले गेले.  आता  मात्र मागील २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात बरीचशी घट झाली असली  तरी कमाल तापमान सरासरीच्या २ ते ३ अंश जास्त आहे.

[yuzo_related]

असे असले तरी, उर्वरित  महाराष्ट्रातील कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके नोंदले गेले आहे.

पुढील २४ तासांनंतर, विदर्भातील किमान तापमानात वाढ होईल, तर कमाल तापमानात घट होईल.

स्काय मेट च्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हरियाणा आणि उत्तर राजस्थानावर चक्रवात तयार होत आहे. ज्यामुळे दक्षिण मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. ज्यामुळे ढगाळ वातावरण तयार होऊन, तुरळक ठिकाणी हलका  ते मध्यम पाऊस वाऱ्यांच्या  गडगटासह  नागपूर,वर्धा, अकोला, परभणी, लातूर आणि  नांदेड ह्या भागात ११ आणि १२ फेब्रुवारीला पडण्याची शक्यता आहे.

Click the image above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात सुद्धा  पावसाच्या हलक्या सरी पडतील, पण त्यामुळे जास्त काही फरक पडणार नाही. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः  ढगाळ किंवा पूर्ण  ढगाळ राहील. कोंकणात मात्र वातावरण कोरडे राहील.

महाराष्ट्रात पावसाचा  जोर १३ फेब्रुवारी नंतर कमी होण्याची शक्यता असली तरी विदर्भात मात्र अधून मधून पावसाचा जोर राहील.

शेतीची कामे करण्याची शिफारस       

विदर्भ आणि  मराठवाड्यातील शेतकऱ्यांना  असा सल्ला देण्यात येतो कि , त्यांनी  रब्बीतील कापणीस  तयार पिके  जसे कि  हरभरा, ज्वारी, करडई  आणि गहू ११ फेब्रुवारी पूर्वी कापून सुऱक्षित ठिकाणी  ठेवावी, जेणेकरून  पिकांचे नुकसान होणार नाही. आवश्यकतेनुसार उशिरा  पेरलेल्या  हरभरा आणि गव्हाच्या  पिकास सिंचित करावे.तसेच गारपीट होण्याच्या शक्यतेमुळे  पिकांची योग्य  ती काळजी घ्यावी.

विदर्भातील शेतकरी बांधवानी १५ फेब्रुवारी पूर्वी उन्हाळी  पिकांची पेरणी  पूर्ण  करावी. ढगाळ हवामान आणि पावसाच्या स्थितीत भाजीपाला व फळ पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येते.

Image Credit: maharashtradarshan

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES