मराठवाडा आणि विदर्भात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पावसाचा लपंडाव चालू होता. महाराष्ट्रातील ह्या दोन भागात बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या दमट वाऱ्यांच्या संगमाने ढगाळ हवामान तयार होऊन पाऊस पडतो. उन्हाळा ऋतूच्या हंगामात, साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमान वाढून, पूर्व मोसमी घटना जसे कि अवकाळी पाऊस आणि वादळी वारे सुटतात. पण ह्या वेळेस मात्र, कॉमोरीन भागात कमी दाबाचा केंद्र तयार होऊन आता १३ ला त्याची तीव्रता वाढतेय. तसेच लक्षद्वीप ते मध्य प्रदेश आणि संपुर्ण मराठवाडा व विदर्भ ह्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे.
म्हणूनच १४ मार्च ला मराठवाड्यात पावसाची सुरुवात होईल. १५ मार्च तर मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्यामध्ये पावसास सुरुवात होईल. हा कालावधी गारपिटीस पोषक असून गारपिटीची शकयता नाकारता येत नाही. १७ मार्च नंतर पावसाची तीव्रता कमी होईल.
[yuzo_related]
पावसामुळे, वाढलेल्या तापमानात घट होईल आणि तापमान ३५ अंशाच्या खाली येईल. परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ जिल्यांमध्ये पाऊस पडेल.
शेतीची करावयाची कामे
पावसाच्या आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे शेतकरी बांधवानी गहू, ज्वारी आणि करडई पिकाची कापणी करावी. तसेच शेतकरी बांधवानी पिकलेल्या संत्रा , मोसंबीची काढणी करावी. पाऊस, गारपीट आणि ढगाळ हवामान ह्यामुळे फळबागांमध्ये फुलगळ आणि फळगळ होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी उपाययोजना करावी.
Image Credit: ToI
Any information taken from here should be credited to skymetweather.com