मागील बऱ्याच दिवसापासून मध्य महाराष्ट्र आणि कोंकण विभागात पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथील कमाल तापमनात उल्लेखनीय वाढ झाली ज्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास होत होता. पण आता ह्या भागातील नागरिकांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या, अरबी समुद्रात कमी दाबाचे केंद्र तयार झाले आहे, ज्यामुळे कोंकण आणि मध्य महाराष्ट्रावर मध्यम स्वरूपाचे ढग तयार झाले आहेत. सोबतच उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्रवात तयार झाले आहे.
सोबतच कमी दाबाचा पट्टा कोंकण भागापासून गोव्यापर्यंत अस्तित्वात आहे. वरील सर्व हवामानाच्या स्थितीचा एकत्रित परिणाम म्हणून, पुढील २४ तासात ह्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या दुपारपर्यंत हवामान ढगाळ राहील, तर दिवसाच्या उत्तरार्धात पाऊस होईल. सोबतच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे, जेणेकरून पिकास नुकसान होऊ शकते .
[yuzo_related]
आज उत्तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर,नाशिक, जळगाव ,धुळे, पुणे, मुंबई आणि नाशिक येथे काही प्रमाणात पाऊस झाला आहे. तर दक्षिण महाराष्ट्र सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोंकणात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मोठ्या पावसाची शक्यता आहे. झालेल्या पावसामुळे तापमानात घट होईल.
बदलत्या हवामानात शेतीची करावयाची कामे
शेतकरी बांधवानी रब्बी हंगामातील तयार पिके काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. शेतकरी बांधवानी भुईमूग आणि मका पिकास गरजेनुसार पाणी दयावे. पाऊस आणि तापमानांतील बदलांमुळे आंब्याचा मोहोर/ बहरास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी दक्ष राहावे. शेतकरी बांधवानी फळबागेस नुकसान होऊ नये म्हणून उपाययोजना करावी.
Image Credit: Wikipedia
Any information taken from here should be credited to skymetweather.com