[Marathi] पुणे व नाशिक येथे चांगला पाऊस; मुंबई, नागपूर येथे हलक्या सरी

September 8, 2017 6:08 PM | Skymet Weather Team

मागीलकाहीदिवसांपासूनपावसानेमहाराष्ट्रालाथोडीविश्रांतीदिल्यानंतर, आतापुन्हाएकदा गेल्या 24 तासात महाराष्ट्रातीलकाहीजिल्ह्यांमध्येपावसानेपुन्हाहजेरीलावलेलीआहे.

प्रामुख्याने दक्षिण कोकण व गोवा, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार, तर विदर्भात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान,  उत्तर कोकण व गोवा आणि उत्तर मध्य-महाराष्टात मात्र हवामान कोरडेच आहे.

गेल्या २४ तासात हर्णे येथे सर्वाधिक ८२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे, तसेच बीड येथे 80.4 मिमी, सातारा 67.4 मिमी, सांगली 53 मिमी, विजापूर 51.4 मिमी, यवतमाळ 27 मिमी, भिरा 27 मिमी आणि पुणे 22 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. मुंबईत मात्र दोन्ही वेधशाळांनी गेल्या २४ तासांत पावसाची नोंद केलेली नाही.

[yuzo_related]

महाराष्ट्र राज्यावरील या चांगल्या पावसाचे कारण दोन हवामान प्रणालींशी संबंधीत असू शकते. एक उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा उत्तर छत्तीसगढ ते दक्षिण तमिळनाडू, तसेच तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या विदर्भ भागातून जात आहे, आणि दक्षिण कोकण व गोवा आणि कर्नाटक या किनारी भागालगतएक चक्रवाती क्षेत्र आहे.

Click above to see the live lightning and thunderstorm across Maharashtra

स्कायमेटच्याअंदाजानुसारसध्याकोकण-गोवाआणिमध्य-महाराष्ट्रातपाऊसवाढण्याचीशक्यताआहे. तसेच, पुणे, नाशिक, रत्नागिरी, हर्णे आणि महाबळेश्वर येथे काही ठिकाणी एक-दोन जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. शिवाय, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

त्यानंतरचक्रवातीक्षेत्राचीतीव्रताकमीहोईलआणित्यामुळेपावसाचाजोरदेखीलकमीहोईलअसेअपेक्षितआहे. असेअसलेतरीबऱ्याचभागाततुरळकसरींचीनोंदहोवूशकते.

Image Credit:    

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES