[Marathi] संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाऊस

June 10, 2019 4:33 PM | Skymet Weather Team

मुंबईत काही काळ हवामान गरम आणि आर्द्र होते, तथापि, शहर परिसरात पाऊस झालेला आहे. काल शहरामध्ये गडगडाटासह विखुरलेला पाऊस नोंदला गेला. ज्यामुळे दीर्घकाळापर्यंत सुरु असलेल्या कोरड्या वातावरणाला पूर्णविराम मिळाला. गेल्या २४ तासात सांताक्रूझ येथे ३ मिमी तर कुलाबा येथे १ मिमी पाऊस नोंदला गेला.

पावसामुळे दिवसाचे तापमान जे सामान्यतपेक्षा तीन अंशांनी वाढले होते त्याचप्रमाणे किमान तापमानात देखील काही प्रमाणात घट झाली आहे. या पावसाचे श्रेय कमी दाबाच्या क्षेत्राला जाते, ज्याची तीव्रता अजून वाढली आहे आणि सध्या ते पूर्व मध्य अरबी समुद्रावर स्थित आहे. ही प्रणाली उत्तर / उत्तरपश्चिम दिशेने महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर असा प्रवास करेल आणि पुढील २४ ते ४८ तासांमध्ये चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

आता या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे मुंबई आणि उपनगरात पूर्व मान्सूनच्या पावसाचा लपंडाव पुढील काही दिवस सुरू राहील. खरं तर, १२ जून रोजी  मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. तसेच १५ जूनच्या आसपास पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.

या पावसामुळे, कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी घट होवून ३३ अंशाच्या आसपास स्थिरावेल. आगामी दिवसांमध्ये, हवामान ढगाळ राहील आणि वाऱ्याचा वेग देखील वाढेल. दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांची पश्चिम किनारपट्टीवर रेलचेल असेल ज्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात समुद्र खवळलेला असेल. हि परिस्थितीची १५ जूनपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे, मच्छिमारी साठी समुद्रात जाणे टाळण्याचा सल्ला देखील देण्यात येत आहे.

प्रतिमा क्रेडीट: NativePlanet

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES