[Marathi] महाराष्ट्रातील बहुतेक भागांत पावसाचा जोर कमी राहणार

July 13, 2019 5:11 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील बहुतेक भागात पावसाळी गतिविधींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तथापि, किनारी भागात चांगले पर्जन्यमान दिसून आले. मुंबईत देखील हलका पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत तापमान वाढले आहे.

गेल्या २४ तासांत शुक्रवार सकाळी ८:३० पासून वेंगुर्लामध्ये ६८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर रत्नागिरीमध्ये ३५ मिमी, महाबळेश्वरमध्ये १३ मिमी, जळगावमध्ये १२ मिमी आणि डहाणूमध्ये ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या, पश्चिम किनारपट्टीवरील ट्रफ रेषा दक्षिण कोकणपासून उत्तर केरळ पर्यंत विस्तारत आहे. तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत कोणतीही प्रभावी प्रणाली कार्यरत नाही. या ट्रफ रेषेमुळे किनारपट्टीवर मध्यम ते जोरदार असे दक्षिण-पश्चिम वारे वाहत आहे. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत मुंबईसह उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, रत्नागिरीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, वेंगुर्ला आणि त्याच्या आसपासच्या भागात काही जोरदार सरी पडतील. येत्या २४ ते ४८ तासांत मध्य महाराष्ट्रातील काही भाग,विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे.

Image Credits – Whatshot

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES