महाराष्ट्रामध्ये मान्सूनने वेग पकडला असून गेल्या २४ तासांत राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस झाला आहे. खरं तर, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. परंतु, मुंबईसह उत्तर किनारी भागांमध्ये पावसाची प्रगती मंद राहिली आहे.
स्कायमेटनुसार, काही प्रमुख हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात आगामी दिवसांत जोरदार पाऊस पडेल. या प्रणालीमध्ये एक ट्रफ रेषा दक्षिण महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत विस्तारत आहे. शिवाय, छत्तीसगड आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही प्रणाली दक्षिण-पश्चिम दिशेने व हळूहळू पश्चिम / उत्तर-पश्चिम दिशेने झुकलेली आहे.
ह्या प्रणालींच्या गतिविधींमुळे, पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. जळगाव, औरंगाबाद, आणि नाशिक या ठिकाणी पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसासोबत जोराचा वारा असेल. मुंबईत हलका ते मध्यम पाऊस असून आकाश ढगाळ राहील.
दरम्यान, सामान्यपणे राज्यात हवामानाची स्थिती आर्द्र असून उबदार असेल. कृषी दृष्टिकोनातून, हा पाऊस सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयोगी ठरेल. तसेच पावसामुळे तापमानात हि घट होईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे