मागील बऱ्याच दिवसात, कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास गेले आणि काही ठिकाणी तर त्यापेक्षाही जास्त नोंदले गेले. पण मागील २४ तासात झालेल्या पावसामुळे तापमानात बऱ्यापैकी घट झाली आहे.
कालपासून झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील नागरिकांची गर्मी पासून थोड्या काळासाठी सुटका झाली. मागील २४ तासात, गुरुवारी सकाळी ८.३० पासून, अलिबाग येथे १ मिमी पावसाची नोंद झाली, तर पुणे येयचे ०.१ मिमी च्या सरी कोसळल्या. त्या दरम्यान महाबळेश्वर आणि राजधानी मुंबई येथे पण तुरळक पाऊस झाल्याची माहिती मिळाली.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार, अशक्त कमी दाबाचा पट्टा कोंकण, गोवा आणि सभोवतालच्या भागात अस्तित्वात आहे, ज्यामुळे ह्या भागात पाऊस झाला. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या पस्चिम मध्य भागात असून, तेथे कमी दाबाचे क्षेत्र आहे.
[yuzo_related]
Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra
हवामानाच्या या स्थितीमुळे, पुढील २४ तासात कोंकण आणि मध्य महाराष्ट्रावर ढगाळ हवामानासोबत पावसाच्या सरी पडतील. ज्यामुळे तापमानातअजून काही अंशाची घट होण्यास मदत होईल. परंतु, १७ मार्च नंतर, हवामान स्वच्छ होऊन, तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल.
शेतकरी बांधवांसाठी सूचना
ढगाळ हवामानामुळे आंबा आणि काजूच्या मोहोरास फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवानी दक्ष राहावे. रब्बी हंगामातील पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. गरजेनुसार उन्हाळी पिकास पाणी द्यावे. भाजीपाला पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी.
Image Credit: Times of India
Any information taken from here should be credited to skymetweather.com