[MARATHI] विदर्भातील तळपत्या उन्हात श्री. राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी तब्बल १५ किमी पदयात्रा

April 30, 2015 4:29 PM | Skymet Weather Team
महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी यांनी अमरावती येथे रणरणत्या उन्हाला न जुमानता तब्बल १५ किमी लांब पदयात्रा काढली.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत अमरावती येथे कमाल तापमानाची नोंद ३९० से. झालेली आहे. तसेच श्री. राहुल गांधींनी पदयात्रेस सुरुवात आज सकाळी १० च्या सुमारास केली आणि आज दुपारपर्यंत तेथील तापमान ४२० से. होण्याची शक्यता आहे. हि उष्णता श्री. राहुल गांधींना त्रासदायक ठरू शकते.
विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येचे प्रमाण हे जास्त असल्याचे आढळून आले आहे. अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना श्री राहुल गांधी यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली तसेच ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटूंबाचीही विचारपूस केली.
श्री राहुल गांधी यांनी या पदयात्रेची सुरुवात गुंजी या गावापासून केली, तेथून त्यांनी धामणगाव रेल्वे तहशील, राजना आणि टोंगलबाद या गावांना भेट दिली. या पदयात्रेत त्यांनी वादग्रस्त भूसंपादन विधेयका विरुद्ध मुद्दा उपस्थित केला. या विधेयकात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या संमतीची गरज नाही असाही वादग्रस्त मुद्दा आहे.
गेल्या वर्षी (२०१४) मधील दुष्काळाने तसेच यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यंदा तर शेतातील तोडणीला आलेली उभी पिके अवकाळी पावसाने पार झोपली आणि वाया गेलेली आपण बघितले आहे.
तसेच आतापर्यंत सरकार एकही कृषी विमा योजना उत्तमरीत्या राबविण्यात अयशस्वी ठरलेले आहे. कृषी विमा योजना हा एक उत्तम पर्याय आहे आणी तो अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी आधार बनू शकतो आणि त्यांना काही अंशी नुकसान भरपाई मिळू शकते. पण या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळतच नाही आणि या मुळेच या योजना यशस्वी होऊ शकत नाहीत.
(Featured Image Credits: ibnlive.in)

OTHER LATEST STORIES