पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश मध्ये मे च्या शेवट पर्यंत पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु राहणे अपेक्षित

May 25, 2019 6:26 PM | Skymet Weather Team

 

 

पंजाब आणि हरियाणाच्या उत्तर भागात व उत्तर प्रदेशच्या उत्तर पश्चिम भागात आणि उत्तर राजस्थानच्या एक दोन ठिकाणी गेल्या २४ तासात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

अमृतसर, चंदीगड, अंबाला, यमुनानगर, पिलानी आणि जालंधर येथे, गेल्या २४ तासात धुळीचा वादळासह हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय, या भागांवर जोराच्या वेगाने वारे सुद्धा वाहत आहे.

होणाऱ्या पावसामुळे, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट दिसून आलेली आहे. रात्र सुद्धा आनंददायी आणि आरामदायक झाली आहे.

झालेल्या पावसाचे कारण आहे एक पश्चिमी विक्षोभ आणि त्याच्या प्रभावाने बनलेली चक्रवाती परिस्थिती. दोन्ही परिस्थिती पूर्व/उत्तर पूर्व दिशेत पुढे चालत आहे.

Also read in English: On and off pre Monsoon rains to continue in Punjab, Haryana, Rajasthan and UP until May end

स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तरपश्चिम भागांवर येणाऱ्या २४ ते ३६ तासात हवामान कोरडे राहील, ज्यामुळे तापमानात सुद्धा लक्षणीय वाढ दिसून येईल. तथापि, रात्र आनंददायी आणि आरामदायक राहील.

२४ ते ३६ तासानंतर, एक अजून पश्चिमी विक्षोभ, जो सध्या अफगानिस्तानच्या उत्तर भागांवर बनलेला आहे, पूर्व/उत्तर पूर्व दिशेत चालू लागेल, ज्यामुळे, पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थान मध्ये एकदा पून्हा धुळीचा वादळासह पावसाचे आगमन होईल.

OTHER LATEST STORIES