मागील दोन दिवसांत महाराष्ट्रात तापमान वाढीमुळे उष्णता वाढली आहे. कोंकण आणि गोव्यात सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. असे असून मागील २-३ दिवसात तापमानात किंचित घट झाल्याचे आढळून आले. तापमानात घट होऊन सुद्धा, कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळ नोंदले जात आहे.
स्काय मेट वेदर च्या निरीक्षणानुसार , तापमनात झालेली घट हि उत्तर आणि ईशान्य दिशेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे यामुळे आहे. स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार, पुढील २-३ दिवस उत्तर आणि ईशान्य दिशेकडून येणारे थंड वारे वाहतील, तसेच तापमान कमाल पातळीवर राहतील, तसेच तापमानात वाढ होणे अपेक्षित नाही. किमान तापमान सुद्धा सरासरी पातळीच्या वर राहतील. काल अलिबाग, डहाणू, नाशिक, पुणे, मुंबई, सांगली, सातारा शहरात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त होते.
मध्य महाराष्ट्र सुद्धा मागील काही दिवसापासून कोरड्या हवामानाचा अनुभव घेत आहे. आकाश निरभ्र असून स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे ह्या भागात दिवस उष्ण आहेत.
[yuzo_related]
दरम्यान, स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार, ८ मार्च च्या आसपास वाऱ्यांच्या संगमामुळे, उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ हवामान तयार होईल. ज्यामुळे नाशिक, मालेगाव, जळगाव, पुणे येथे ढगाळ हवामान राहील. ढगाळ हवामानामुळे तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्या पुढील २-३ दिवस दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.
शेतकरी बांधवांसाठी शिफारस
शेतकरी बांधवानी उशिरा लागवड केलेल्या रब्बी पिकाची कापणी पूर्ण करावी. वाढलेल्या तापमानामुळे नवीन लागवड केलेल्या आंबा, डाळिंब, केळी आणि भाजीपाला पिकास पिकास नियमित सिंचित करावे. शेतकरी बंधूनी फळझाडास गवताचे किंवा भुस्याचे आच्छादन करावे. डाळिंब आणि द्राक्ष फळाची काढणी करावी तसेच वाढलेल्या तापमानामुळे किडींचे नियंत्रण करावे. तापमानातील बदलांमुळे आंबा, डाळिंब आणि मोसंबी बागेत फुलगळ आणि फळगळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपाय योजना करावी.
Image Credit: tripadvisor
Any information taken from here should be credited to skymetweather.com