[Marathi] ज्वारी, गहू पिकाची कापणी पूर्ण करावी, नाशिक येथे कोरडे हवामान

February 23, 2018 5:40 PM | Skymet Weather Team

मागील काही दिवसात महाराष्ट्रातील  हवामान बहुतांशी स्वच्छ आणि  निरभ्र  राहीले आहे.  उत्तर महाराष्ट्रातील दिवस आणि रात्रीचे तापमान  सरासरीच्या  वर  राहिले आहे, तर दक्षिण  मध्य महाराष्ट्रात  रात्रीचे तापमान सरासरी एवढे राहिले आहे.

काल मध्य महाराष्ट्रातील  बहुतांश  जिल्ह्यात  तापमान  जवळपास  ३५°C किंवा त्यापेक्षा  जास्त नोंदले गेले.  जळगाव येथील कमाल तापमान ३६.२°C, तर  सोलापूर येथे ३६°C  नोंदले  गेले.  पुणे, नाशिक आणि  सांगली  येथे दिवसाचे तापमान अनुक्रमे  ३४.६°C, ३४°C आणि ३४. ४°C  नोंदले गेले.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार,  सध्या  कोणतीही  विशिष्ट हवामान  प्रणाली  कार्यरत नाही, ज्यामुळे  मध्य  महाराष्ट्रात  हवामान  कोरडे राहील.

मात्र  उत्तर मध्य महाराष्ट्रात  २४ फेब्रुवारी ला ढगाळ हवामान राहील, सोबतच  वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी विजेच्या  गडगडाटासह  पाऊस  पडायची शक्यता आहे.

पुढील आठवड्यात पडणारा अवकाळी पाऊस हा काही भागातच पडणार आहे. हवामानाची हि स्थिती २८ फेब्रुवारी ते १ मार्च  पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तापमानातं  मोठी घट होण्याची  शक्यता  नसली  तरी,१-२°C ची  घट नाकारता येत नाही.  स्काय मेट वेदर ची खात्री आहे कि,   कालावधी गारपीट होण्यास पोषक असून  उत्तर मध्य महाराष्ट्रा सह, जळगाव, नाशिक, मालेगाव येथे गारपीट होण्याची शक्यता आहे.

शेतीसाठी शिफारस

मध्य  महाराष्ट्रातील  शेतकरी बांधवाना असे   आवाहन  करण्यात येते कि  पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे त्यांनी ज्वारी,  गहू आणि करडई  ची  कापणी  करून  सुरक्षित ठिकाणी  ठेवावी.  तसेच द्राक्ष, डाळिंब, आंबा, पेरू, आणि भाजीपाला शेतकऱ्यांनी  ह्या कालावधीत विशेष काळजी  घ्यावी. तसेच नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी.

[yuzo_related]

Image Credit:  Makemytrip.com          

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES