[Marathi] नागपूर, अकोला, परभणी, पुणे येथे पाऊस पडण्याची शक्यता; पिकांस पानी देणे लांबवावे

April 2, 2018 5:08 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत गेल्या 24 तासांत तापमानात घट नोंदवली आहे. तेलेंगना आणि छत्तीसगढ या राज्यांतील पावसामुळे हा परीणाम घडला आहे. जरी या तापमान घटीमुळे विदर्भ आणि मराठवाडा मधे जास्त पाऊस पडणार नसेल तरी अंशतः ढगाळ आकाश होऊ शकते.

या दोन विभागाचे तापमान अत्तापर्यंत दोन ते चार अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. काही दिवसांपूर्वी सामान्य पातळीपेक्षा एक ते दोन अंशांपेक्षा जास्त नोंदविले गेले आहे, एकंदरीत तापमानांमधे घट झाली आहे.

बहुतेक स्टेशन नी जास्तीचे तापमान ४० अंश एवढे नोंदविले आहे. काल, नांदेड येथे ४२. ५ अंश, चंद्रपूर ४२ अंश, अकोला ४१. ७ अंश, नागपूर ४१.४ अंश, परभणी४०.९ अंश, अमरावती व गोंदिया ४०.४ अंश, औरंगाबाद ३९.२ अंश आणि बुलढाणा येथे ३८.४ अंश. एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.

[yuzo_related]

दुसरीकडे, किमान तापमान सामान्य जवळ राहिले. skymet च्या हवामानुसार पुढील 24-48 तास विदर्भ आणि मराठवाडा भागामध्ये पावसाची कोणतीही शक्यता नाही आणि हवामान कोरडे राहील. तथापि, तुरळक पाऊस ५ एप्रिल किंवा ६ एप्रिल दरम्यान होऊ शकतात.

या वेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस नागपूर, अकोला, चंद्रपूर, परभणी, उस्मानाबाद या भागात होऊ शकतो. त्या वेळी, दिवसाचे तापमान घटण्याची शकत्या आहे आणि शिवाय, हा पाऊस व्यापक स्वरूपात होणार नाही तो काही काही पट्टयामध्ये होईल. या उलट, कोकणातील हवामान जवळजवळ कोरडा राहण्याची शक्यता असून, 7 आणि 8 एप्रिल ला मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह तुरळक पाऊस होण्याची शक्यता नाकारू शकत नाही.त्यामुळे, पुणे आणि नाशिक मधे देखील गडगडाटी वादळांसह पाऊस होऊ शकतो.

विदर्भ आणि मराठवाडा कृषी घटकांवर ,उष्ण हवामानाचा होणारा परिणाम पाहू:

मागील 24 तासांत तापमानात किरकोळ घट झाली आहे, त्यामुळे भाजीपाला पिके आणि आंबा, द्राक्षे, संत्रा,या फळांवर रोग व कीड पडण्याची शकत्या. म्हणून शेतकऱयांना सल्ला देण्यात येत आहे कि पीक निरीक्षण करावे व योग्य ती उपाय योजना करावी . ढगांच्या गडगडाटासह 5 एप्रिल किंवा 6 ला पाऊस पडण्याची शक्यता,म्हणुन शेतकर्यानी उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आणि पिकांस पानी देणे लांबवावे.

Image Credit: tripadvisor            

Any information taken from here should be credited to skymetweather.com 

OTHER LATEST STORIES