Skymet weather

[Marathi] ईशान्य मान्सूनच्या आगमनास परिस्थिती अनुकूल, तामिळनाडूत पाऊस

October 15, 2019 1:26 PM |

Northeast Monsoon

नैऋत्य मॉन्सूनप्रमाणेच ईशान्य मॉन्सूनच्या आगमनास एक निकष आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ हे पाच उपविभाग आहेत जिथे ईशान्य मॉन्सूनचा हंगाम अनुभवाला जातो.

नैऋत्य मॉन्सून परतण्यास सुरुवात झाली जी ईशान्य मॉन्सूनच्या आगमनास परिस्थिती अनुकूल होते.

ईशान्य मॉन्सून हंगामास सुरुवात झाल्याची घोषणा करण्यासाठीचे निकष

१) उत्तरेस अक्षांश १५° पर्यंत नैऋत्य मॉन्सून परतलेला असावा

२) तमिळनाडू किनाऱ्यावर जमिनीलगत पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरवात होते

३) तामिळनाडू किना-यावर पूर्वेकडील वारे वातावरणात ८५० मिलीबार थरापर्यंत असावे

४) तामिळनाडू किनारपट्टी, आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर आणि त्याच्या आसपासच्या भागात जोरदार पाऊस

५) वर उल्लेख केलेले निकष अस्तित्वात असल्यास १० ऑक्टोबरपूर्वी हंगामास
सुरुवात झाल्याची घोषित केली जात नाही

साधारणत: नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून वारे पूर्वेकडून किंवा ईशान्येकडून वाहण्यास सुरुवात होण्याची सामान्य तारीख १४ ऑक्टोबरच्या आसपास असते आणि चार ते पाच दिवस निरीक्षण केले जाते. ईशान्य पावसाळी हंगामास सुरूवात होण्याची सरासरी तारीख २० ऑक्टोबर आहे (पाच दिवसांच्या त्रुटीसह).

तसेच, ईशान्य मॉन्सूनला सुरूवात बहुधा नैऋत्य बंगालच्या उपसागरामध्ये कमकुवत कमी दाबाचा पट्टा किंवा पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाखाली होते.

नेहमीच हंगामास सुरुवात जोरदार नसते, काही वेळेस हि सुरुवात अगदी सौम्य देखील असू शकते.

दरम्यान काही हवामान प्रणाली ईशान्य मॉन्सूनच्या प्रगतीस अडथळा आणू शकतात किंवा रोखू शकतात आणि हा चक्रीवादळाचा देखील हंगाम आहे.

गेल्यावर्षी २०१८ मध्ये दोन वादळ तयार झाले आणि ते दोन्ही खूप शक्तिशाली होते. चक्रीवादळ तितली बंगालच्या उपसागरात तयार झाले होते आणि ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान सक्रिय होते. जवळपास ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान याच काळात चक्रीवादळ लुबान अरबी समुद्रात तयार झाले होते. तज्ञांच्या मते अरबी समुद्रातील वादळांमुळे अधिक नुकसान होते कारण त्यामुळे नैऋत्येकडील वारे जास्त काळ टिकून राहतात.

गेल्या वर्षी २०१८ मध्ये, अरबी समुद्रातील शक्तिशाली प्रणालीमुळे नैऋत्येकडील वारे जास्त काळ टिकून राहिले आणि म्हणूनच, ईशान्य मॉन्सूनला उशीरा सुरुवात झाली.

त्या काळात, तामिळनाडूत जास्त पाऊस झाला ज्यामुळे नैऋत्य मॉन्सूनच्या गतिविधींमध्ये वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये देखील तामिळनाडूत बराच पाऊस झाला. या दोन प्रणालींच्या प्रभावामुळे वारे दिशा बदलू शकले नाहीत, अशा प्रकारे ईशान्य मॉन्सूनला उशीर झाला आणि साधारण १ किंवा २ नोव्हेंबरच्या आसपास सुरुवात झाली.

जेव्हा चक्रीवादळ कमकुवत झाले आणि पाऊस देखील कमी झाला आणि त्यानंतर नैऋत्य मॉन्सूनने ईशान्य मॉन्सूनसाठी मार्ग मोकळा केला.

वादळांच्या प्रभावामुळे वाऱ्याला देखील पूर्वेकडील / ईशान्येकडील वाऱ्यात रूपांतरित होण्यासाठी वेळ लागला आणि अशा प्रकारे ईशान्य मान्सूनला सुरूवात होण्यास विलंब झाला.

यावर्षी, अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात कोणत्याही चक्रीवादळाच्या उत्पत्तीची अपेक्षा नसल्याचे आधीच संकेत आहेत आणि ईशान्य मॉन्सूनला लवकरच या आठवड्याच्या अखेरीस कधीही सुरुवात झाल्याचे दिसून येईल.

या पार्श्वभूमीवर तामिळनाडूत, विशेषत: तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील भागात पुढील तीन ते चार दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Credits – Telegraph India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try