Skymet weather

विदर्भ, मराठवाडा, तेलंगाणाच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून तूर्तास सुटका नाही

May 28, 2019 10:05 AM |

Heat Wave in India

विदर्भ, मराठवाडा, तेलंगाणा, दक्षिण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या बऱ्याच ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे.

सध्या, उष्णतेच्या लाटांचा प्रभाव आणखीन पसरणे अपेक्षित आहे. खरं तर, राजस्थान मधील भाग जसे चुरु, बिकानेर व उत्तर प्रदेशचे पूर्व भाग जसे वाराणसी, येथे देखील येणाऱ्या दिवसात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Also read in English: Heat wave to cover parts of Delhi, Haryana, Rajasthan, Gujarat, MP and eastern states now

याशिवाय, झारखंड मधील एक दोन ठिकाणी सुद्धा गरम हवामानासह कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जातात आहे. खरं तर, तेलंगाणा मध्ये पार ४७ अंश किंवा त्याच्या वरती पोहोचून गेला आहेत. सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे कि यणाऱ्या दिवसात, तापमान आणखी वाढणे अपेक्षित आहे.

काल, रामगुंडम मध्ये कमाल तापमान ४७.२ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला, तसेच, ब्रम्हपुरी आणि नागपूर मध्ये ४६.७ अंश, वर्धा मध्ये ४६.५ अंश, चंद्रपूर मध्ये ४६.४ अंश, परभणी मध्ये ४६.१ अंश आणि आदिलाबाद मध्ये ४५.८ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला.

आमची अशी अपेक्षा आहे की, येणाऱ्या दोन ते तीन दिवसात, कोणत्याही महत्वपूर्ण हवामान प्रणालीच्या अनुपस्थित, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगाणा, उत्तर आंतरिक कर्नाटक, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओडिशा मध्ये अजून काही ठिकाण उष्णतेची लाट अनुभवतील.

याशिवाय, सध्या या भागांवर, उत्तर पश्चिम दिशेने गरम आणि कोरडे वारे वाहत आहे ज्यामुळे ह्या भागातील तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जातील.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try