[Marathi] नागपूर मध्ये पाऊस, परभणी मध्ये कोरडे हवामान,उन्हाळी मक्यास सिंचन करावे

March 6, 2018 3:46 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात सर्वदूर कोरडे हवामान आहे. मागील बऱ्याच काळापासून राज्यातून पाऊस गायब झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात  गारपीट आणि पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली होती.

कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या तापमानात उल्लेखनीय वाढ  झाली आहे. पण, मागील २-३ दिवसात, विदर्भ आणि मराठवाड्यातील दिवस आणि रात्रीच्या  तापमानात किंचित घट झाली आहे. जरी तापमानात घट झालेली असली तरीही, कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या तुलनेत  २-३ अंशाने जास्त आहेत.

कालचे, अमरावती आणि औरंगाबाद  येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा १ अंशाने जास्त होते, त्यापाठोपाठ; परभणी, बुलढाणा,नागपूर आणि चंद्रपूर  येथील तापमान  सरासरीपेक्षा २ अंशाने जास्त होते. तर,  नांदेड,अकोला, वर्धा, यवतमाळ,येथील कमाल तापमान  सरासरीपेक्षा ३ अंशाने  जास्त होते.

[yuzo_related]

स्काय  मेट वेदरच्या अंदाजानुसार, सद्यस्थितीनुसार,  येथून पुढे विदर्भ आणि मराठवाड्याच्या  तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पुढील ४८ तासात हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहील.  त्यानंतर  ८ मार्च च्या आसपास  विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रावर  ढगाळ हवामान राहील. ढगाळ हवामानामुळे, उत्तर विदर्भाच्या  गोंदिया, बुलढाणा आणि नागपूरच्या भागात तुरळक ठिकाणी  हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पण त्याविरुद्ध  मराठवाड्यात मात्र ९ आणि १० मार्च ला हवामान कोरडे राहील. आग्नेय  दिशेकडून येणारे दमट वारेआणि वायव्य दिशेकडून येणारे थंड वारे विदर्भ भागात येऊन मिसळण्याच्या  शक्यतेमुळे ढगाळ वातावरण आणि पावसास पोषक हवामान तयार होत आहे.

शेतीसाठी शिफारस

उष्ण आणि गरम हवामानामुळे, शेतकरी बंधूनी  आंबा, डाळिंब, मोसंबी, निंबू आणि द्राक्ष बागेस  नियमित पाणी द्यावे.  तसेच तापमानातल्या होणाऱ्या चढ-उतारामुळे  फळबागेवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यासंबंधी शेतकरी बंधूनी काळजी घ्यावी. उन्हाळी मका आणि भुईमुगाच्या पिकास आवश्यकतेनुसार पाणी दयावे.  तापमानातील होणाऱ्या चढ - उतारामुळे  आंबा, मोसंबी, डाळींब फळबागेत फुलगळ आणि फळगळ होऊ शकते त्यामुळे शेतकरी बंधूनी ह्याबाबत जागरूक राहावे.

Image Credit: makemytrip               

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES