[Marathi] नागपूर, अकोला, हिंगोली, जालना मध्ये अवकाळी पावसाची शक्यता, फळबागेस नुकसान होण्याची शक्यता

March 13, 2018 4:50 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रात मार्च  महिन्यात आतापर्यंत पाऊस कमीच राहिलेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा  मार्च महिन्यात पाऊस झालाच नाही. फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात पाऊस आणि गारपिट झाल्यानंतर,  हवामान पूर्णतः कोरडेच राहिले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात ह्या कालावधीत पाऊस होण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालचा उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून येणारे दमट वाऱ्यांचा ह्या भागात येऊन संगम होतो,  ज्यामुळे ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस येतो.

अरबी समुद्रात एखादी हवामाची विशिष्ट प्रणाली कार्यरत असल्यास सुद्धा पाऊस पडतो. आता सुद्धा महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस पाडण्याचे कारण हेच आहे. स्काय मेट च्या हवामान अंदाजानुसार, कमी दाबाचे केंद्र विषुवृत्ताजवळ भारतीय महासागरात श्रीलंकेच्या जवळ तयार आहे.  कमी दाबाचे केंद्र  पश्चिम -ईशान्य दिशे कडे सरकत आहे, पुढील २४ तासात  कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होईल.

[yuzo_related]

वातावरणाच्या ह्या स्थितीमुळे,ह्या  दोनही भागात १५ मार्च ला  पाऊस पडेल. १६ मार्च ला पावसाची तीव्रता वाढून गारपीट होण्याची शक्यता आहे. १७ मार्च ला सुद्धा पाऊस  सुरूच राहील आणि १७ मार्च ला  रात्रीनंतर पावसाचा  जोर कमी होईल. पण पुढील २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात हवामान पूर्णतः  कोरडे राहील.

अमरावती, अकोला, नागपूर,नांदेड, जालना आणि हिंगोली जिल्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा जोर राहील.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

सध्याचे मराठवाड्यातील आणि विदर्भाच्या  कमाल तापमानात घट झाली आहे आणि सध्याचे तापमान सरासरी इतके आहे. परंतु, किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा २-३ अंशाने जास्त आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात अजून घाट होण्याची शक्यता आहे.

बदलत्या हवामानात शेतीची करावयाची कामे

तापमानातील बदलांमुळे, भाजीपाला पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकारी बांधवानी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी बांधवानी भुईमूग आणि मका पिकास  गरजेनुसार पाणी  दयावे. त्याप्रमाणेच पावसाची शक्यता लक्षात घेऊन संत्रा , मोसंबी, द्राक्ष आणि डाळिंब फळांची काढणी करावी. तसेच रब्बी हंगामातील तयार पिके काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी.

Image Credit: YouTube        

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES