[Marathi] नागपूर, गोंदिया परिसरात पावसाची शक्यता, १५ फेब्रुवारी नंतर पीक कापणी करावी

February 13, 2018 6:45 PM | Skymet Weather Team

मागील काही दिवसांपासून कोरडे आणि शुष्क  वातावरण असलेल्या विदर्भात गेल्या  २४ तासांत मोठ्या पावसाची नोंद झाली. पावसासोबत झालेल्या गारपिटीमुळे पिकांची  मोठ्या प्रमाणात हानी झाली.

मराठवाड्यात सुद्धा विजेच्या गडगटासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, पण गारपिटीची तीव्रता मात्र विदर्भापेक्षा कमी होती. मागील  २४ तासांत  मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी चांगल्या  पावसाची नोंद झाली. विदर्भ आणि  मराठवाड्याच्या  पावसाच्या तीव्रतेत मात्र फरक होता.

मागील २४ तासांत, सोमवारी सकाळी ८.३० पासून,  चंद्रपूर  येथे ३४ मिमी  पावसाची नोंद झाली, तर  उदगीर  यथे ३० मिमी, ब्रह्मपुरी  येथे २४ मिमी, यवतमाळ  येथे १४ मिमी, वर्धा  येथे ६.६ मिमी, अमरावती  ४.२ मिमी,  गोंदिया १.८ मिमी आणि नागपूर येथे १.२ मिमी  पावसाची नोंद झाली.

[yuzo_related]

कमाल  तापमान जे  सरासरीपेक्षा  ४-५ अंश सेल्सिअस  जास्त होते, त्यामध्ये  घट  होऊन आता सरासरीच्या खाली  २-३ अंश सेल्सिअस  खाली गेले आहे. मराठवाड्यात जरी पावसाची तीव्रता कमी  झाली असली तरी, येत्या  २४ तासांत  तुरळक  पावसाची  शक्यता आहे.

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

मराठवाडा आणि परिसरावर कमी तीव्रतेचे चक्रवात अस्तित्वात आहे.  तसेच कमी  दाबाचा  पट्टा  मराठवाड्यपासून   विदर्भांसह पूर्वी  मध्य प्रदेश वर तयार आहे. त्याबरोबरच  बंगालच्या  उपसागरावरून येण्याऱ्या  दमट  वाऱ्यामुळे विदर्भांवर पाऊस  पडला आहे.

वर  असलेल्या  वातावरणाच्या स्थिती मुळे  विदर्भ आणि मराठवाड्यावर येत्या  २४ तासांत पाऊस पडण्याचा  अंदाज आहे. त्यानंतर  हवामान शुष्क आणि  निरभ्र  राहील.  दिवसाचे तापमान सुद्धा  सरासरीच्या खाली राहील, येत्या २४ तासांत ते सरासरीच्या  खाली २-३ अंश राहण्याची  शक्यता आहे.  २४ तासानंतर  विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान  थंड , आल्हाददायक आणि कोरडे राहील.

पावसाचे पिकांवर झालेलले परिणाम

विदर्भ  आणि मराठवाड्यतील  शेतकरी बांधवानी  शेतात उभी असलेली रब्बी पिके : गहू, हरभरा आणि करडई; फळपिके : संत्रा, डाळिंब, द्राक्ष, आंबा, पपई, केळी पिकांची  पाऊस  आणि वाऱ्यांपासून  संरक्षण  करण्याची योग्य ती  उपाययोजना  करावी.  तसेच भाजीपाल्याची  पिके टोमॅटो, कांदे  यांचे  पावसापासून सरंक्षण  करावे.  शेतकरी बांधवानी  १५ फेब्रुवारीनंतर पिकांच्या कापणीस सुरुवात करावी. शेतकरी बांधवानी  कापलेली  पिके  सुरक्षित ठिकाणी ठेवावीत  किंवा  प्लास्टिक आच्छादावे.

Image Credit: tripadvisor              

Any information taken from here should be credited to skymetweather.com

OTHER LATEST STORIES