Skymet weather

[Marathi] नागपूर, अकोला, परभणी येथे अजून पावसाची शक्यता, कापलेली पिके आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत

March 16, 2018 6:30 PM |

maharashtra post

स्काय मेट वेदर ने पूर्वी वर्तवलेल्या  हवामान अंदाजानुसार,महाराष्ट्राच्या काही भागावर पावसाने हजेरी लावली. पावसाची तीव्रता जरी कमी असली तरी, काल  झालेल्या पावसामुळे नागरिकांना वाढलेल्या पाऱ्यापासून आणि उकाडयापासून सुटका मिळाली.

विदर्भ आणि मराठवाड्यात मागील दोन दिवसात तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. परंतु काल झालेलया पावसामुळे,  तापमानाचा पारा जो  ३० अंशाच्या वॉर जात होता तो आता २० अंशाच्या जवळ स्थिरावला आहे.

मागील २४ तासात, गुरुवारी सकाळी ८.३० पासून, यवतमाळ येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली, ब्रम्हपुरी २ मिमी, नागपूर, गोंदिया  आणि परभणी  येथे १ मिमी पावसाची नोंद झाली.  त्या दरम्यान,अमरावती, अकोला, बुलढाणा येथेपण तुरळक  पावसाची नोंद झाली. स्काय मेट वेदर, नुसार कमी दाबाचा पट्टा छत्तीसगढ पासून मराठवाडा आणि विदर्भावर आहे,तो पाऊस होण्यास  कारणीभूत आहे.

[yuzo_related]

Maharashtra

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

हवामानाच्या या स्थितीमुळे,  पुढील २४ तासात  विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासोबत पावसाच्या सरी पडतील. ज्यामुळे तापमानात  काही अंशाची  घट होण्यास मदत होईल. परंतु, १७ मार्च नंतर, हवामान स्वच्छ होऊन, तापमानात वाढ होण्यास सुरुवात होईल.

शेतकरी बांधवांसाठी सूचना

पाऊस आणि गारपिटीची  शक्यता लक्षात घेऊन  शेतकरी बंधूंनी  पिके आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच  काढणीस  तयार संत्रा, मोसंबी, डाळिंब आणि द्राक्ष फळे  काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शेतकरी बांधवानी आंबेमोहोर धरलेल्या  आंबा, डाळिंब आणि निंबु  फळपिकांची  ढगाळ हवामानात काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार उन्हाळी पिके आणि फळबागेस सिंचित करावे.

Image Credit:  Wikipedia           

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try