[Marathi] मुंबईत हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित

June 18, 2019 4:16 PM | Skymet Weather Team

आता पर्यंत चक्रीवादळ वायुच्या प्रभावाने मुंबई शहरावर दक्षिण पश्चिम वारे वाहत होते. या वाऱ्यांमुळे मुंबईत गेल्या बऱ्याच दिवसांपासून चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत होती.

गेल्या २४ तासात, कोलाबा मध्ये ७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, तर सांता करुज मध्ये ६.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील इतर १० सर्वात पावसाळी ठिकाण येथे पहा:

स्कायमेटच्या अंदाजानुसार, चक्रीवादळ वायु आता कमकुवत झाले आहे ज्यामुळे मुंबई शहरात पावसाची तीव्रता कमी होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे मुंबईसह तटीय भागात २३ जूनपर्यंत हलका पाऊस सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. तथापि, त्यानंतर विकसित होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.

येणाऱ्या २४ तासात, मुंबईत कोलाबा आणि सांता करुज, येथे हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

हवामान प्रणाली

पुढे, २१ जूनच्या आसपास, पश्चिम बंगालच्या पश्चिम मध्य खाडीत एक कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याची अपेक्षा आहे. या प्रणालीमुळे, बंगालच्या खाडीपासून आर्द्र वारे महाराष्ट्रावर वाहतील. तसेच, उत्तर मध्य प्रदेश पासून ते उत्तर कोकण आणि गोवा पर्यंत एक ट्रफ रेषा विकसित होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, उष्ण आणि आर्द्र दक्षिण-पश्चिम वारे उत्तर -पूर्व दिशेने येणाऱ्या वाऱ्यांशी मिळतील. परिणामी एक कॉन्फ्लुएंझ झोन तयार होईल.

या हवामान प्रणालीमुळे, मुंबईसह विदर्भ आणि आसपासच्या भागात २१ जून रोजी चांगल्या पावसाची सुरूवात होईल. खरं तर, २१ ते २५ जून दरम्यान विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

अपेक्षित हवामानाच्या क्रियाकलापांमुळे, मुंबईत दक्षिण पश्चिम मान्सून २०१९ चे लवकरच आगमन होईल, असे म्हणता येईल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES