महाराष्ट्राची राजधानी मुंबई मध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तसेच मुंबईकर मागील काहीदिवसांपासून कोरडया हवामानाचा अनुभव घेत होते. पण बेभरवशाच्या निसर्गाच्या लहरींमुळे, चमत्कारिकरित्या डिसेंबरमहिन्यामध्ये मुंबईत पावसाचे आगमन झाले आहे.
अतितीव्र चक्रीवादळ "ओखी" तीव्र अशा चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन उत्तर आग्नेय दिशेस वाटचाल करत आहे, त्यामुळेकाल रात्रीपासून मुंबईत चांगलाच पाऊस पडत आहे.
आज सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची तीव्रता देखील वाढलेली असून, पहाटे ५.३० ते ८.३० ह्या कालावधीत ११ मिमीपावसाची नोंद झाली आहे.
[yuzo_related]
गेल्या २४ तासात सांताक्रुझ वेधशाळेने तब्बल २२ मिमी पावसाची नोंद केलेली आहे. ह्याकालावधीत कुलाबा वेधशाळेने देखील२३ मिमी एवढ्या पावसाची नोंद केलेली.
Click here to get the live lightning and thunderstorm status across Mumbai
सामान्यपणे, डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये पाऊस पडत नाही, या महिन्यात शहरात हवामान प्रामुख्याने कोरडे असते आणिक्वचितच पाऊस पडतो. पण चक्रीवादळ ओखीच्या प्रभावामुळे झालेल्या पावसामुळे मुंबईत डिसेंबर महिन्यातील पावसाचामागील एका दशकाचा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये २०१४ साली १.५ मिमी पावसाची नोंद झालीहोती.
आज मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून, दिवसभरामध्ये एक-दोन जोरदार सरीकोसळण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभरामध्ये तीव्र वारे ताशी ४०-५० किमी ते अतितीव्र स्वरूपाचे ताशी ६० किमीवेगाने वारे वाहतील
उद्या मात्र पावसाचा जोर कमी होईल, त्याबरोबरच वादळाची तीव्रता सुद्धा कमी होईल आणि चक्रीवादळ दक्षिण गुजरातकडेमार्गक्रमण करेल, असे असून सुद्धा ६ डिसेंबर रोजी देखील तुरळक पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Image Credit: cleartrip
Any information taken from here should be credited to skymetweather.com