Skymet weather

[Marathi] मुंबई, पुणे, नाशिक येथे कोरडे हवामान, गहू आणि फळपिकांसाठी फायदेशीर

February 13, 2018 3:49 PM |

Mumbai weather

मराठवाडा आणि विदर्भांत मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस  आणि गारपीट झाली असली तरी, मध्य महाराष्ट्र आणि कोंकणात मात्र हवामान कोरडे राहिले आहे.

पूर्व भारताच्या भागात असलेली वाऱ्याची चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा  पट्टा  ह्या मुळे  कोंकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान निरभ्र  राहिले. वातावरणाच्या ह्या स्थिती मुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस झाला असून, मध्य महाराष्ट्र आणि कोंकण भागाची पावसापासून सुटका  झाली. दरम्यान  बंगालच्या उपसागरावरून येणारे दमट  वारे मध्य महाराष्ट्रावरून वाहत असल्यामुळे, ह्या भागातील दिवसाच्या तापमानात थोडीशी घट  झाल्याचे आढळून आले.

स्काय मेट वेदर च्या निरीक्षणानुसार, राजस्थान च्या वायव्य  भागात असलेले  चक्रवात आता पूर्व दिशेकडे सरकले आहे.  त्याप्रमाणेच, उत्तर आणि  ईशान्य  भागावरून  थंड वारे मध्य महाराष्ट्र आणि कोंकण भागावरून वाहत असल्यामुळे  किमान तापमानात घट झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

[yuzo_related]

मुंबईचे रात्रीचे  तापमान २ अंश  सेल्सिअस  ने घटून  १५.८ अंश  सेल्सिअस  नोंदले गेले  महाबळेश्वर  आणि रत्नागिरी  येथे सुद्धा किमान तापमानात १ अंश  ने घट झाली.

Mumbai

Click here to get the live lightning and thunderstorm status across Maharashtra

मध्य महाराष्ट्र  आणि  कोंकणात  हवामान कोरडे  आणि निरभ्र  राहील. तशेच किमान  तापमान  सरासरीच्या खाली राहील.  रात्रीचे वातावरण थंड आणि आल्हाददायक राहील, तर दिवस निरभ्र आकाश आणि कोरडे राहिल्यामुळे,उबदार राहतील. दिवसाचे तापमान  साधारणतः  २० ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

शेतीची  करावयाची कामे

निरभ्र  आणि थंड हवामानामुळे गहू  आणि फळबागांना  फायदा होईल. मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना असे आवाहन करण्यात येते कि  त्यांनी  तयार रब्बी  पिके  : गहू, ज्वारी  आणि हरभरा ह्याची कापणी  पूर्ण करावी.

कोंकणातील शेतकरी बांधवानी उन्हाळी पिकांची पेरणी पूर्ण करावी.  मागील काही दिवसात ढगाळ हवामानामुळे आंबा, काजू, डाळिंब  आणि द्राक्षं  बागांमध्ये  रोग आणि कीड पडण्याच्या  शक्यतेमुळे शेतकरी बनधवानी दक्ष  राहावे. गरज पडल्यास  रोग  नियंत्रणासाठी  फवारणी करावी.

Image Credit: Wikipedia.org           

Any information taken from here should be credited to skymetweather.com






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try